Illegal LED Fishing Boats | एलईडी मासेमारी बोटींवरील कारवाई तीव्र करा

Illegal LED Fishing Boats | मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
Illegal LED Fishing Boats
Illegal LED Fishing Boats
Published on
Updated on

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

एलईडी वापरण्याची परवानगी नसलेल्या मासेमारी बोटींवर कारवाई करण्यासाठी तपासणी मोहीम व्यापक प्रमाणात राबवावी, असे निर्देश मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. मागील काही दिवसांत रत्नागिरी व सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर एलईडीबाबत कारवाया करून नौका जप्त केल्या आहेत; मात्र ही मोहीम तीव्र करण्याच्या सूचना दिल्या.

Illegal LED Fishing Boats
Ratnagiri Water Crisis | कोकण होरपळतंय! रत्नागिरीत एप्रिलच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईचे चटके; 'या' दोन गावांत टँकर सुरू

मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीस मत्स्य व्यवसाय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. रामास्वामी एन., मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, सहआयुक्त महेश देवरे व युवराज चौगुले आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री राणे म्हणाले, एलईडी वापरण्याची परवानगी नसलेल्या मासेमारी बोटींद्वारे होत असलेली मासेमारी रोखण्यासाठी त्यांच्यावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी अचानक भेटी दिल्या पाहिजेत.

Illegal LED Fishing Boats
Nashik Saree Distribution | अंत्योदय लाभार्थ्यांना मिळणार मोफत साड्या

या कामासाठी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी, असे निर्देशही त्यांनी बैठकीत दिले. मागील काही दिवसांत एलईडीने मासेमारी करणाऱ्या नौकांवर रत्नागिरी, जयगड व सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. यातील नौका जप्त करण्यात आल्या. एलईडी मासेमारीची संख्या वाढली असल्याने कारवाईची मोहीम तीव्र करण्याचे आदेश मंत्री राणे यांनी दिले आहेत.

अतिसंवेदनशील लँडिंग पॉईंटस्वर सुरक्षा रक्षक नेमण्याची सूचना

या बैठकीत मत्स्य व्यवसाय विभागाच्या नवीन आकृतिबंधानुसार कर्मचारी भरती प्रक्रिया, सागरी किनाऱ्यावरील ९१ अतिसंवेदनशील लँडिंग पॉईंटस्वर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत सुरक्षा रक्षक व पर्यवेक्षक नेमणे, प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत 'सागर मित्र' नेमणुकीसंदर्भातही आढावा घेऊन संबंधित यंत्रणांना याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news