

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील १ लाख ७६ हजार ६०५ अंत्योदय कार्डधारक लाभार्थ्यांना रेशन दुकानांमधून साड्यांचे वितरण केले जाणार आहे. शिधासोबत साडी मोफत दिली जाणार असून, एका रेशन कार्डवर एकच दिली जाईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांनी दिली.
शासनाने अंत्योदय रेशन कार्डधारक म्हणजे गरीब कुटुंबांना मोफत साडी देण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षापासून हा उपक्रम शासनाने सुरू केला आहे. यंदाही जिल्ह्यातील एक लाख ७६ हजार ६०५ लाभार्थ्यांना त्याचा लाभसंबंधित गावातील रेशन दुकानामार्फत वितरित केले जाणार आहे.
शासनाने त्यासाठी पुरवठा विभागाकडून जिल्ह्यातील लाभार्थ्यांची मागणी नोंदविण्याचे सांगितले होते. त्यानुसार पुरवठा विभागाने वस्त्रोद्योग महामंडळाकडे मागणी नोंदविली होती. त्याचे नियतन शासनाने मंजूर केले आहे. या योजनेसाठी राज्यभरातून लाखो महिलांनी नोंदणी केलेली आहे.
गरीब कुटुंबाला मदत म्हणून शासनाची योजना आहे. जिल्ह्यातील सर्व अंत्योदय लाभार्थीना लवकरच साड्या उपलब्ध झाल्यावर रेशन दुकानातून लाभदिला जाईल.
- रमेश गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी