

रत्नागिरी : महामार्गाची सुरक्षितता आणि प्रवाशांना आवश्यक माहिती त्वरित उपलब्ध व्हावी यासाठी राश्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक महत्वकांक्षी योजना आखली आहे.प्रत्येक महामार्गावर क्यूआर कोड असलेली विशेष होर्डिंग्ज लावली जाणार आहे. हा कोड स्कॅन करताच महामार्गाशी संबंधित सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. रत्नागिरी येथील मुंबई-गोवा महामार्गावर क्यूआर कोड लावण्यात येणार आहे.कोड स्कॅन करताच ठेकेदाराची संपूर्ण कामाची कुंडली आपणास दिसणार आह. केवळ महामागाची माहितीच नाहीत तर पेट्रोल पंप, पोलिस स्टेशन, ई-चार्जिंग स्टेशन, रुग्णालये, हॉटेलची माहिती ही कळणार आहे.
या क्यूआर कोडमुळे महामार्गावरील पुढील काही किलोमीटरमध्ये येणारे टोल प्लाझा, पंक्चर दुरुस्तीची दुकाने तसेच इलेक्ट्रिक वाहनांसाठी ई-चार्जिंग स्टेशन्स यांची अचूक माहिती मिळणार आहे.त्याचबरोबर अपघात किंवा वाहनात बिघाड झाल्यास नागरिक तत्काळ क्यूआर कोड स्कॅन रून गस्त टिम किंवा रेसिडॅट इंजिनियर यांच्याशी संपर्क साधू शकतात. आपात्काली नंबर 1033 असेल, त्यामुळे त्वरित मदत मिळण्यास मदत होणार आहे.त्याचबरोबर गस्त, टोल व्यवस्थापक, अभियंता यांचे संपर्क क्रमांक, कामाची माति, प्रकल्पाची लांबी,बांधकाम, देखभाल कालावधी यासह विविध माहिती आपणास एका स्कॅनने कळणार आहे. प्रत्येक राष्ट्रीय महामार्गावर विशिष्ट अंतरावर कोड असलेले बोर्ड लावण्यात येणार आहे. रत्नागिरी महामार्गावर हातखंबा येथे एक क्यूआर कोडचा बोर्ड लावण्यात आला आहे. हा क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी कोणत्याही विशेष ॲपची गरज भासणार नाही.