Mental Health| भावनिक कमकुवतपणाचा गैरवापर; अंधश्रद्धेच्या विळख्यात महिला

Mental Health| विश्वासाचा गैरफायदा; भोंदूबाबांच्या जाळ्यात 'ती' का अडकते
Mental Health News
Mental Health NewsPudhari
Published on
Updated on

नाशिक : अंजली राऊत

सामाजिक बंधने आणि संवादाचा अभाव यामुळे अनेकदा व्यक्ती मानसिकदृष्ट्या एकाकी पडते. योग्यवेळी आधार न मिळाल्यास ती परिस्थितीचा सखोल विचार न करता भावनांच्या प्रवाहात वाहून जाण्याची शक्यता वाढते. यात महिला भावनिक असल्याने त्यांच्या कमकुवतपणाचा फायदा भोंदूद्वाबांकडून घेतला जातो. एकदा चक्रव्यूहात अडकल्यानंतर हा फास आणखी आवळला जातो. त्यामुळे जागरुकतेने तर्कसंगत होऊन विचारापूर्वक पावले टाकावीत, याबाबत मानसोपचारतज्ज्ञ आणि गृहिणींसोबत साधलेला संवाद...

Mental Health News
Saptashrungi Gad Chaitrotsav 2026 | गडावरील चैत्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज

स्त्रिया मल्टिटस्किंग असल्याने त्यांना मानसिक आधाराची गरज जास्त असते. दडपण आणि विविध बंधने असतात. त्यातून ती मोकळे होण्याचा प्रयत्न करते. अशावेळी संवादाचा अभाव आणि मानसिक आधार मिळाला नसल्याने ती मागचा पुढचा विचार न करता त्या प्रवाहात ओढली जाते. वस्तुनिष्ठ दृष्टिकोन ठेवला तर कोणतेही दैवतीकरण करताना ते चेक केले पाहिजे, असं केले तर असे प्रश्न निर्माण होणार नाहीत.

- डॉ. अंजली जोशी, मानसोपचारतज्ज्ञ

सर्वप्रथम अडकलेल्या महिलांना सन्मानपूर्वक वागणूक द्यायला हवी, कारण त्यांना मानसिक आधार हवा असतो. त्यांची ओळख सोशल मीडियावर याप्रमाणे व्हायरल केल्याने गंभीर डिप्रेशनमध्ये जाण्याचा संभाव्य धोका असतो. महिला किंवा पुरुष कोणीही असो, त्यांच्यामध्ये एका 'सुपर ह्युमन व्यक्तिमत्त्वाची क्रेझ' असते. संवादाचा अभाव, मनाचा कोंडमारा वातून एक खोटा आशावाद निर्माण झाल्याने वावा, महाराज, गुरू आणि त्यांच्या सहकारी यांच्याकडे जाते.

- डॉ. हेमंत सोननीस, मानसोपचारतज्ज

भीती आणि घाबरवले जात असल्याने महिला यात बळी पडतात. कुटुंब आणि नातेसंबंध हे आजही महिलांसाठी सर्वोच्च प्राधान्याची गोष्ट असते. पारंपरिक कर्तव्यासाठी त्या नेहमी सजग असतात. त्यासाठी कोणतीही भीती आणि धमकीमुळे उच्चशिक्षित महिलांचाही भावनांपुढे तर्कविचार थांबतो. महिला अशा भोंदू‌गिरीत अडकतात. परंपरा, नियम फॉलो कराव्या लागतात. त्यासाठी अशा गोष्टींकडे तर्कसंगत विचारपद्धतीने बघायला हवे. प्रबोधनाची गरज आहे.

-डॉ. योगिता अपाटे, मानसोपचारतज्ज्ञ

त्रिया भोंदवावांच्या प्रभावाखाली येण्यामागे केवळ अंधश्रद्धा नसून ती मानसशास्त्रीय गरजांशी जोडलेली प्रक्रिया आहे. भावनिक रिक्तता, कोणीही आपले म्हणणे न ऐकले जाण्याची भावना आणि आयुष्यातील अनिश्चिततेची भीती यामुळे व्यक्तीला 'सोपे, खात्रीशीर उपाय' देणाऱ्या व्यक्तीचे आकर्षण वाटते, उपाय म्हणून कोणतीही टीका न करता आत्मविश्वास व निर्णयक्षमता वाढवणे, भावनिक जागरूकता करणे आणि सकारात्मक विचार रुजवणे आवश्यक आहे.

- डॉ. मृणाल भारद्धाज, मानसोपचारतज्ञ्ज

महिलांची मानसिकता ही धार्मिक व आध्यात्मितेकडे झुकणारी असते. विवेक संपला की, अशा गोष्टी सुरू होतात. अशा भोंदूबाबांचे सर्वप्रथम टारगेट महिला असतात, माहिती, ज्ञानाचा आणि भावनिकतेच्या अभावामुळे महिला जास्त फसतात. सामान्यपणे लैंगिक शोषण झाल्याने त्यानंतर पीडितेला टारगेट करत आणखी गुंफले जात असल्याने अशा भोंदूबाबांचे फावत असते. उच्चशिक्षण महत्त्वाचे नाही तर धर्म आणि अध्यात्म त्यात ढोंग आणि खरे अध्यात्म यातील फरक समजला पाहिजे. अध्यात्म आणि चमत्कार यातील फरक समजावून सांगितला पाहिजे.

- डॉ. नीरज देव, मानसोपचारतज्ज्ञ

अशा भो‌गिरीच्या प्रकरणात लिंगभेद असा नाहीच, परंतु, महिला भावनिक असतात आणि परिस्थिती देखील त्याला कारणीभूत असल्याने महिला पटकन आहारी जातात. ज्या व्यक्ती मनाने कमकुवत असतात, त्याच अशा भोंदूबाबांच्या प्रकरणात अडकतात. भावनिक असुरक्षितता आणि मानसिक ताणतणावात सारासार बुद्धीने जागरूक राहणे गरजेचे आहे. भावना आणि विचारांचा पाया भक्कम असणे आवश्यक आहे.

- कविता निंभोरकर, गृहिणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news