कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत

पेडणे बोगद्यात पाणी आल्याने अनेक गाड्या रद्द ; काही गाड्या अन्य मार्गाने वळवल्या
Konkan Railway service disrupted
कोकण रेल्वेची सेवा विस्कळीतPudhari Photo
Published on
Updated on

रत्नागिरी : दीपक शिंगण

कोकण किनारपट्टीत मागील काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गोव्यातील पेडणे येथील रेल्वे बोगद्यातून पाणी वाहू लागले आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्ग धावणाऱ्या मांडवी, तेजस तसेच जनशताब्दीसह आज (बुधवार) धावणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Konkan Railway service disrupted
मुंबईत धो धो कोसळून थकलेल्या पावसाची विश्रांती

कोकण रेल्वेच्या कारवार रीजनमधील गोव्याच्या हद्दीत समाविष्ट असणाऱ्या मडुरे ते पेडणे दरम्यानच्या रेल्वेच्या भुयारी मार्गात पाणी वाहू लागले आहे. दिनांक ९ जुलै रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आला. यानंतर सुरुवातीला काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मंगळवारी रात्री 10 वाजून 13 मिनिटांनी ट्रॅक फिटनेस सर्टिफिकेट मिळाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली होती.

Konkan Railway service disrupted
मराठवाड्यासह विदर्भ भूकंपाने हादरला; ४.५ रिश्टर स्केलची नोंद

त्या पाठोपाठ आजही दिनांक 10 जुलै 2024 रोजी पहाटे 2.59 वाजण्याच्या सुमारास पेडणे बोगद्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी येऊ लागल्याने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून कोकण रेल्वेनकडून या मार्गाने धावणाऱ्या काही गाड्या रद्द केल्या आहेत.

Konkan Railway service disrupted
चिपळुणात ५ जणांवर धारदार शस्त्राने वार

मागील वर्षाची पुनरावृत्ती

गेल्या वर्षी देखील पावसाळ्यात पेडणे येथील बोगद्यात पाणी वाहू लागल्यामुळे रेल्वेच्या सेवेत व्यत्यय आला होता. त्या घटनेची पुनरावृत्ती दिनांक 9 जुलैपासून होऊ लागली आहे. आज दिनांक 10 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास ही समस्या पुन्हा उद्भवल्यामुळे पुन्हा रेल्वे सेवेत बाधा निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत या मार्गावरून धावणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्याचे रेल्वेने बुलेटीनद्वारे कळवले आहे. मात्र आणखी काही गाड्या रद्द होऊ शकतात अशी स्थिती आहे.

दहा वर्षांपूर्वी रत्नागिरी नजीकच्या निवसर येथे देखील रुळाखालून पाणी वाहू लागल्यामुळे रुळ खचण्याचे प्रकार घडत होते. या समस्येचा सामना कोकण रेल्वेने अनेक वर्षे केला. अखेर ज्या ठिकाणी रूळ खचत होते, तिथला रेल्वे मार्ग बदलून त्याच भागातील दुसऱ्या ठिकाणी रेल्वे रुळ टाकावे लागले. त्यानंतरच ही समस्या निघाली निघाली आहे. या कामावर कोकण रेल्वेला कोट्यवढी रुपयांचा खर्च करावा लागला. अशाच प्रकारची स्थिती पेडणे येथे तर निर्माण होत नाही ना, अशी भीती निर्माण झाली आहे. पेडणे येथील बोगद्यात सध्या निर्माण झालेल्या समस्येमुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्‍या आहेत तर अनेक गाड्या या समस्येमुळे मार्गावरच खोळंबून राहिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news