

मुंबई : भारतीय हवामान विभागातर्फे (आयएमडी) मुंबईसह ठाणे तसेच रायगड जिल्ह्याला दिलेला पावसाचा अलर्ट हा मंगळवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतचा होता. त्यानंतर यलो अलर्ट होता, असे आयएमडी शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी स्पष्ट केले.
सोमवारी मुंबईसत आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट होता. त्याप्रमाणे दिवसभर आणि रात्री मुसळधार पाऊस पडला. खबरदारी म्हणून राज्य सरकारने मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. मात्र, मंगळवार कोरडाताक गेला, त्यामुळे हवामान विभागाच्या अंदाजाबाबत शंकेला वाव मिळाला. मात्र, आपल्या अंदाजावर ठाम असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
उपग्रहांसह बलूनच्या माध्यमातून आम्ही वातावरणातील बदलांचा अंदाज घेतो. या अंदाजासह वेदर मॉडलच्या आधारे पुढील पाच दिवसांच्या हवामान तापमानाचा अंदाज वर्तवितो, असे नायर यांनी पुढे सांगितले.
जुलैमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले. पावसाळ्यातील चार महिन्यांपैकी जुलैमध्ये मुंबईसह कोकण किनारपट्टीवर सर्वाधिक पाऊस पडतो. याबाबत अधिकृत आणि सविस्तर माहिती पुढील आटवढ्यात दिली जाईल. मात्र, मुंबईसह कोकण किनारपट्टीवर जुलैमध्ये अतिवृष्टीची शक्यता अधिक आहे, असे सुषमा नागर पुढे म्हणाल्या.
लोकलचा लेटमार्क सुरूच सोमवार सकाळपासून मंगळवार सकाळपर्यंत सांताक्रूझ वेधशाळेमध्ये १५४ आणि कुलाबा येधशाळेमध्ये १६१ मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईकरांना अक्षरशः झोडपून काढणाऱ्या पावसाने सोमवारी मध्यरात्रीपासून विश्रांती घेतली. मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून शहर विभागात ३.६ मिमी, पूर्व उपनगरातील ३.८५ मिमी तर पश्चिम उपनगरांत ३.३५ मिमी पाऊस झाला. पाऊस कमी असल्यामुळे आज दादर मार्केटसह शहर व उपनगरातील मार्केटमधील व्यवहार सुरळीत सुरू होते. अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे नागरिकही फारसे घराबाहेर पडले नाहीत. त्यामुळे लोकल ट्रेनसह बेस्ट बसमध्ये नेहमीपेक्षा कमी गर्दी होती. टॅक्सी व रिक्षाही रिकाम्या धावत होत्या, मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावर काही तांत्रिक समस्या असल्यामुळे लोकल ५ ते १० मिनिटे विलंबाने धावत होत्या. त्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास दुसऱ्या दिवशीही लांबला.
विभागीय हवामान केंद्र, कुल्लावारुपा संकेतस्थळानुसार, मुंबईला बुधवारसह पुढील तीन दिवस पावसाचा ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार, मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे, ठाणे आणि रायगडसह कोकण किनारपट्टीला यलो अलर्ट आहे. या भागात काही ठिकाणी चांगल्या सरी बरसतील.