Ratnagiri News : कोंडगावमधील घरफोडीत साडेसात लाखांचा ऐवज लंपास

बंद घराचे कुलूप फोडून चोरट्यांनी साधला डाव; रोकड, दागिने गायब
Ratnagiri theft case
कोंडगावमधील घरफोडीत साडेसात लाखांचा ऐवज लंपासPudhari Photo
Published on
Updated on

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव केतकर गल्ली येथील एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 7 लाख 62 हजार 700 रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना रविवारी घडली. याप्रकरणी सुबोध मोरेश्वर जोगळेकर यांनी देवरुख पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

Ratnagiri theft case
Belgaum News : ऊसतोडणी मशीन चालक तरुणाचा संशयास्पद मृत्यू

सुबोध जोगळेकर हे व्यवसायाने वकील असून ते सध्या पुणे जिल्ह्यातील हवेली येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे कोंडगाव येथील घर बंद असल्याचा फायदा उठवत चोरट्यांनी 31 डिसेंबर 2025 ते 3 जानेवारी 2026 या दरम्यान ही चोरी केली. चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजाची कडी तोडली. देवघर आणि बेडरुममधील कपाटाचे लॉकर फोडून 5 लाख रुपयांची रोख रक्कम आणि 1 लाख 75 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरले. तसेच तांब्या-पितळेची जुनी भांडी, स्टीलची भांडी, गॅस सिलेंडरच्या टाक्या, शिलाई मशीनचा भाग आणि पाण्याची मोटर असे सर्वच साहित्य लंपास केले आहे.

या घरफोडीमध्ये 400 किलो वजनाची तांब्याची भांडी, ज्यामध्ये कळशा, बादल्या, हंडे आणि तामन यांचा समावेश होता, तसेच पितळेच्या मोठ्या समयांचीही चोरी झाली आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांनी घरातील संगणक, प्रिंटर, इन्व्हेंटर आणि महत्त्वाचा डेटा असलेल्या 4 हार्ड डिस्क देखील चोरून नेल्या आहेत. शेतीकामासाठी लागणारी कुऱ्हाड, कुदळ, फावडी आणि विळे यांसारखे लोखंडी साहित्यही चोरट्यांनी सोडले नाही. या घटनेची माहिती मिळताच देवरुख पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Ratnagiri theft case
Belgaum Crime : महालक्ष्मीनगर येथे सहा लाखांची घरफोडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news