Belgaum Crime : महालक्ष्मीनगर येथे सहा लाखांची घरफोडी

वडगाव पोलिसांत गुन्हा दाखल
Belgaum theft case
महालक्ष्मीनगर येथे सहा लाखांची घरफोडी Pudhari Photo
Published on
Updated on

बेळगाव : गणेशपूरजवळील महालक्ष्मीनगर येथे सहा लाखांची घरफोडी झाल्याची नोंद वडगाव पोलिसांत झाली आहे. याप्रकरणी प्रदीप बाबू वाडेकर (रा. दुसरा क्रॉस, अव्वा क्वॉटर्ससमोर, भारतनगर, महालक्ष्मीनगर, गणेशपूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

Belgaum theft case
Belgaum crime news: प्रशांत पाटीलचे वास्तव्य कोठे ? बेळगाव, कुद्रेमानी की म्हाळेवाडी

त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 31 डिसेंबर रोजी सायंकाळी फिर्यादी टिळकवाडीतील इस्कॉन मंदिरला गेले होते. सायंकाळी सात ते पावणेआठच्या सुमारास चोरट्याने घराचे कुलूप तोडून कपाटातील 40 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र व अन्य सोन्याचे दागिने पळवून नेले. 68 ग्रॅम सोन्याच्या दागिन्याची चोरी झाल्याची फिर्याद घरमालकाने दिली आहे. वडगाव पोलिसांत नोंद झाली असून पोलिस निरीक्षक नागनगौडा कट्टीमनीगौडर तपास करीत आहेत.

Belgaum theft case
Vande Bharat Express Launch | बेळगाव-बंगळूर वंदे भारत 10 ऑगस्टपासून

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news