Ratnagiri News : महामार्गावरील शिवकालीन भित्तिचित्रे काळवंडली

विकासाच्या गोंगाटात कारागिरांचे श्रम वाया; जाहिराती चिकटवून केले विद्रुपीकरण
Ratnagiri News
महामार्गावरील शिवकालीन भित्तिचित्रे काळवंडली
Published on
Updated on

खेड : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाले. कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून आधुनिक रस्ते बांधले गेले. पण या विकासाच्या गोंगाटात भरणे येथे महामार्गाच्या अंडरपासजवळील संरक्षक भिंतींवर उभारलेली छत्रपती शिवराय आणि मावळ्यांचा शौर्य सांगणारी भव्य चित्रे आज पांढऱ्या-करड्या धुरकट थराखाली गुदमरून गेली आहेत.

Ratnagiri News
Ratnagiri News : लाडघर-बुरोंडी-तामसतीर्थमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

ज्यांनी छत्रपतींचे युद्धदृश्य, रायगडाचा दरवाजा, मावळ्यांची छायाचित्रे इतक्या प्रेमाने रेखाटली, त्यांचे श्रम आज वाया गेल्यागत दिसत आहेत. दरम्यान, काही ठिकाणी तर या भित्तिचित्रांवर जाहिरातींचे पोस्टर लावून विद्रूप करणारा निर्लज्जपणाही करण्यात आला आहे. कोकण दर्शनाचीही अशीच दुर्दशा झाल्याची भावना व्यक्त होत आहे. लोटे घाणेखुंट परिसरात कोकणचे सुंदर दर्शन घडवणारी निसर्गचित्रे काढली गेली. पण रस्त्याकडेला कचरा जाळण्याची प्रवृत्ती आणि प्रशासनाची बेफिकिरी यामुळे ही चित्रेही आगीच्या ज्वाळांनी काळवंडली गेली आहेत.

Ratnagiri News
Ratnagiri Crime | कडवईत घरफोड्या; साडेतीन लाखांचा माल लंपास

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news