Devrukh Protest-देवरुखमध्ये करवाढीविरोधात नागरिक आक्रमक ६ जुलैला काढणार नगर पंचायतीवर मोर्चा

अवाजवी कर वाढीचा जाब विचारणार
Devrukh Tax Hike Protest
Devrukh Protest
Published on
Updated on

देवरुख : देवरुख नगर पंचायत प्रशासनाने मालमत्ता करासह विविध करांमध्ये करण्यात आलेल्या कथित अवाजवी वाढीविरोधात नागरिक आक्रमक झाले असून, येत्या ६ जुलै रोजी सकाळी ११ वा. नगर पंचायत कार्यालयावर धडक देत प्रशासनाला जाब विचारण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. यासंदर्भात मराठा भवन येथे नगरसेवक बाळा कामेरकर यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून करांमध्ये झालेल्या चौपट वाढीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

बैठकीत शिक्षण, आरोग्य तसेच नव्याने आकारण्यात आलेल्या 'वृक्ष कर'वरून प्रशासनाला धारेवर धरत, कोणतीही पूर्वकल्पना न देता एवढी मोठी करवाढ का करण्यात आली, असा सवाल उपस्थित करण्यात आला.

Devrukh Tax Hike Protest
Migration-पंधरा वर्षात सिंधुदुर्गच्या सव्वा लाख नागरिकांचे स्थलांतर

नगर पंचायत हद्दीत ७० टक्के ग्रामीण भागाचा समावेश असूनही तेथील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून केवळ करवसुलीवर भर दिला जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला. या बैठकीस माजी राज्यमंत्री रवींद्र माने, जिल्हा परिषद सदस्या नेहा माने, नगरसेवक बाळा कामेरकर, सुरेश बने यांच्यासह अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Devrukh Tax Hike Protest
Ratnagiri Airport Terminal - रत्नागिरी विमानतळ टर्मिनलचे काम नव्वद टक्के पूर्ण नववर्षात होणार विमानाचे उड्डाण

प्रशासनाने करवाढीचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. बैठकीत ६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता नगर पंचायत कार्यालयावर मोठ्या संख्येने उपस्थित राहून अन्यायकारक करवाढीविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन आंदोलन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news