Congress Protest : शंकांचे निरसन होत नाही तोपर्यंत कंपनी बंद करा!

लोटेतील ‌‘लक्ष्मी ऑरगॅनिक‌’विरोधात काँग्रेसचा मोर्चा
Congress Protest
लोटेतील ‌‘लक्ष्मी ऑरगॅनिक‌’विरोधात काँग्रेसचा मोर्चा
Published on
Updated on

चिपळूण : लोटे औद्योगिक वसाहतीमधील बहुचर्चित ‌‘लक्ष्मी ऑरगॅनिक‌’ विरोधात काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यानंतर कंपनी व्यवस्थापनाने आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना कार्यालयात बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. मात्र, यावेळी उपस्थितांचे समाधान झाले नाही.

Congress Protest
Congress BJP Alliance: भाजपशी हातमिळवणी पडली महागात; अंबरनाथमधील काँग्रेसचे 12 नगरसेवक निलंबित, कार्यकारिणीही बरखास्त

जोपर्यंत स्थानिक ग्रामस्थांचे प्रश्न आणि समस्यांचे निराकरण होत नाही. तसेच, आयआयटी दर्जाच्या तज्ज्ञांची चौकशी समिती नेमून अहवाल येत नाही, तोपर्यंत ही कंपनी बंद ठेवावी; अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिला.

लोटे येथील लक्ष्मी ऑरगॅनिकच्या ‌‘पीफास‌’ या उत्पादनसंदर्भात अनेक आक्षेप घेण्यात आले आहेत. सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये त्याची चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आंदोलनाची हाक दिली होती. गुरुवारी लोटेेतील एक्सल फाटा येथे आंदोलक हातात राष्ट्रध्वज घेऊन सहभागी झाले आणि कंपनी विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. एक्सल फाटा येथून घोषणा देत आंदोलनकर्ते कंपनीच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले. ‌‘बंद करा, बंद करा लक्ष्मी ऑरगॅनिक बंद करा‌’ अशा घोषणा देण्यात आल्या. गुरुवारी सकाळी 11 वा. हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी कंपनी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त होता. खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी सणस यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. माजी खा. हुसेन दलवाई यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. यामध्ये उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग, भरत लब्धे, अशोक जाधव, इब्राहिम दलवाई, उल्का महाजन, निर्मला जाधव, नगरसेवक साजिद सरगुरोह, सफा गोठे, मिसबाह नाखुदा, मुजफ्फर सय्यद, सुमती जांभेकर, राजन इंदुलकर, रविना गुजर, राम रेडीज, सुबोध सावंतदेसाई, सतीश कदम, रामदास घाग तसेच संदीप फडकले आदींसह लोटे परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

कंपनीविरोधात जोरदार घोषणाबाजी

पोलिसांनी सुरुवातीला प्रवेशद्वारावर आंदोलनकर्त्यांना अडवले. यावेेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. बंद बंद करा, लक्ष्मी ऑरगॅनिक बंद करा, कंपनीला टाळे लावा अशा घोषणा देण्यात आल्या. यानंतर आंदोलनकर्त्यांनी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करण्याची मागणी केली. यानंतर पोलिसांनी शिष्टमंडळाला कंपनी कार्यालयात बोलावून घेतले. त्या ठिकाणी कंपनी व्यवस्थापन व आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी दलवाई यांनी मोर्चा काढण्यामागच्या भावना व्यक्त केल्या.

कोकणच्या जीवनमरणाचा प्रश्न!

हा मोर्चा म्हणजे कोकणच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. पीफास उत्पादन येथे होत असल्याने मानवाला धोका आहे. खेड, लोटे परिसरातील अशा अनेक कंपन्या आहेत. त्यांनी सांडपाणी सोडण्यासाठी बोअर मारल्या आहेत. परिसरातील नद्या, नाले प्रदूषीत झाल्या आहेत. पीफासमुळे अनेक रोग उद्भवत आहेत. तसे अहवाल आहेत. त्यामुळे हे उत्पादन बंद करावे, अशी मागणी केली. यावेळी कंपनी व्यवस्थापनाकडून उपस्थित अधिकारी पाटोळे तसेच मुंबई येथून आलेले अधिकाऱ्यांनी कंपनीच्या उत्पादनाबाबत माहिती दिली. मात्र, त्या बाबत उपस्थित आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले नाही.

बैठकीतील चर्चेवर आंदोलनकर्ते असमाधानी

अधिकारी कंपनीचीच बाजू मांडणार, अशी भूमिका घेत आंदोलनकर्ते उदय घाग, भरत लब्धे, अशोक जाधव, पंकज दळवी यांनी आक्षेप घेत या कंपनीत घडलेल्या दुर्घटनांबाबत विषय मांडला. राजू आंब्रे, महेश गोवळकर व अन्य स्थानिक ग्रामस्थांनी कंपनीत घडलेल्या अपघाताबाबत माहिती विचारली व खुलासा मागितला. मात्र, कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या खुलाश्याने त्यांचे समाधान झाले नाही. सध्या कंपनीत 120 कर्मचारी कार्यरत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आम्ही देखील येथे काम करत आहेत. मात्र, सर्वनियमांचे काटेकोर पालन केले जात आहे. पीफासचे तीन टँकर येथून तळोजाला पाठवण्यात आले. या टँकरवर जीपीआरएस असतो. तळोजा येथे पोहोचल्यावर नोंद घेतली जाते. एमपीसीबी व अन्य खात्यांचे त्यावर नियंत्रण असते असे सांगितले. मात्र, उपस्थितांचे समाधान झाले नाही. काँग्रेस जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी, जर पीफास मानवाला घातक असेल तर त्याचे उत्पादनच का केले जातेआणि ते येथेच का केले जाते असा मुद्दा मांडला. यावर समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

अखेर माजी खा. हुसेन दलवाई यांनी या बैठकीदरम्यान कोणतेही समाधान झाले नाही. जोपर्यंत स्थानिक ग्रामस्थ व लोकांच्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत, त्यांचे शंका निरसन होत नाही तोपर्यंत कंपनी बंद ठेवावी आणि आयआयटी दर्जाच्या तज्ज्ञांची समिती नेमावी आणि त्यांच्याकडून अहवाल घ्यावा आणि त्यानंतरच ही कंपनी सुरू करावी, अशी मागणी नायब तहसीलदार इंगळे यांच्याकडे केली. जर याची दखल घेतली नाही तर भविष्यात स्थानिक ग्रामस्थांना बरोबर घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

Congress Protest
Congress Strategy : काँग्रेस 'नेतृत्वासाठी' तरुण चेहऱ्याच्या शोधात! भाजपप्रमाणे 'राष्ट्रीय कार्याध्यक्ष' पद निर्माण करणार?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news