रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : दाभोळच्या खाडीत १ऑगस्टरोजी नीलिमा चव्हाण यांचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी दाभोळ पोलीस ठाण्यात जीवन संपविण्यासाठी प्रवृत्त केल्याबाबत प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम सुरेश गायकवाड (वय २६, मूळ रा. पन्हाळा, कोल्हापूर, सध्या रा. टीआरपी, रत्नागिरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन गुरुवारी रात्री अटक करण्यात आली आहे. (Nilima Chavan death case)
आजवरच्या तपासात प्रथम दर्शनी व्हिसेराची डॉक्टरांनी सामान्य व विशिष्ट रासायनिक चाचणी अंती कोणत्याही प्रकारचे विष दिसून आले नसल्याचे तपासणी अहवालामध्ये नमूद केले आहे. तसेच मृत्यूचे अंतिम कारण बुडून मृत्यू असे नमूद केले आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी चिपळूण, खेड व दापोली येथील एसटी स्थानक, रेल्वे स्थानक व इतर ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करण्यात आलेली आहे. (Nilima Chavan death case)
निलिमाचे वडील सुधाकर तुकाराम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीत दि.१५ एप्रिल ते २९ जुलै २०२३ या मुदतीत आपली मुलगी दापोली येथील ज्या बँकेमध्ये काम करत होती. तेथील मॅनेजर संग्राम गायकवाडला दैनंदिन कामकाजाबाबत रिपोर्टिंग करावे लगत असे. गायकवाड नेहमी १५ दिवसांचे टार्गेट पूर्ण करण्याकरिता तिला वारंवार सुट्टीवर असतानादेखील फोन करत असत. नीलिमाला एका दिवसात ४ ते ५ डी-मॅट खाती उघडण्याकरिता जाणून बुजून दबाव आणत असे. नोकरीला लागल्यापासूनच तिच्यावर टार्गेट पूर्ण करण्याचा दबाव आणला जात होता. त्याचबरोबर नीलिमाला काम जमत नसल्याचे सांगून तिला कामावरून काढून टाकण्याची धमकीही दिली होती. यातूनच ती चिंताग्रस्त झाली होती, असे फिर्यादी यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
याप्रकरणी दाभोळ पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करून गायकवाडला अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा