रत्नागिरी : डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंतीनिमित्त रथयात्रा

रत्नागिरी : डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंतीनिमित्त रथयात्रा
Published on
Updated on

मंडणगड; पुढारी वृत्तसेवा : महामानव डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांची १३२ वी जयंती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मंडणगड शाखेच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आंबडवे येथील बाबासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन सुरू झालेली रथयात्रा देव्हारे, मंडणगड शहर, लाटवण या ठिकाणी पोहोचली. यावेळी नागरिकांना लाडूचे वाटप करण्यात आले.

लाटवण येथील कार्यक्रमानंतर ही यात्रा तालुक्यातील पहिल्या दिक्षाभूमी असेलल्या टाकडे या गावी पोहोचली. येथे बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यानंतर कादवण गावी या यात्रेचा समारोप करण्यात आला. जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चंडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते.

यावेळी दलित मित्र दादासाहेब मर्चंडे, तालुकाध्यक्ष नागसेन तांबे, तालुका सरचिटणीस रामदास खैरे, महिला तालुकाध्यक्ष प्रज्ञा दाभोळकर, जिल्हा संघटक विजय खैरे, जिल्हा सदस्य किरण पवार, अरविंद येलवे, संदेश खैरे, ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील तांबे, सुरेश तांबे, संकेत तांबे, संदीप येलवे, स्वप्निल धोत्रे, विधान पवार, वीरेंद्र जाधव, मुरा तांडेल, आकाश पवार, अंकुश कासारे सत्यम जाधव, संतोष कासारे, भाई कासारे, जितेंद्र जाधव विजय खैरे, स्वप्निल धोत्रे, संकेत तांबे, गौरव मर्चंडे, विरेंद्र जाधव युवक पदाधिकाऱ्यांसह गावागावातील कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

बाबासाहेब मनामनात पोहोचविण्याचा प्रयत्न : आदेश मर्चंडे

दलित शोषित पीडित समाज घटकास संघर्ष करण्याची प्रेरणा बाबासाहेबांनी आपल्या कृतीतून दिली. वंचित समाजघटकांसाठी त्यांनी केलेले कार्य अलौकीक आहे. दुर्लक्षीत समाज घटकास मूळ प्रवाहात आणण्याचे काम बाबासाहेबांनी केले. त्यांचे विचार व कार्य त्यांना कवटाळून चौकटीत बंद करण्यापेक्षा त्यांच्या विचारांची समाजाला आजही गरज आहे. त्यांचे कार्य व विचार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी रथयात्रेचे आयोजन केले होते. त्यास तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news