डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला नगरमध्ये 2 हजार पोलिसांचा बंदोबस्त

police 1
police 1
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जिल्हाभरात मोठ्या उत्साहात साजरी होत असते. जयंतीनिमित्त काढण्यात येणार्‍या मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. शहरासह जिल्ह्यात एक हजार 924 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, मिरवणूक मार्गावर 45 ठिकाणी 70 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शुक्रवारी साजरी होत असून, मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पोलिस प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हाभरात सुमारे दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंडळांचे अध्यक्ष व पोलिस प्रशासनाची बैठकदेखील पार पडली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये, मिरवणुकीला गालबोट लागू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने खबरदारी म्हणून मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यासोबतच शहरातील संवेदनशील चौकात बॅरिकेडिंग करण्यात आले आहे.

नगर शहरातून काढण्यात येणार्‍या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी 257 समाजकंटकांना तडीपार केले असून, सुमारे 80 जणांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत.

मिरवणुकीसाठी 15 मंडळांचे अर्ज
नगर शहरातून मिरवणूक काढण्यासाठी 15 मंडळांनी पोलिस प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. नीलक्रांती चौक मित्रमंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सिद्धार्थनगर, लंकापती प्रतिष्ठान माळीवाडा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सावेडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई), दीपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघ, मिलिंद तरुण मंडळ, सामाजिक न्याय विभाग, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), वीरराजे मित्रमंडळ न्यू टिळक रोड, नीलक्रांती चौक मित्रमंडळ दिल्लीगेट, नमो बुद्धाय ग्रुप रेल्वे स्टेशन, मैत्री युवा प्रतिष्ठान, नालेगाव सार्वजनिक आंबेडकर जयंती उत्सव समिती नालेगाव, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (जोगेंद्र कवाडे गट) या मंडळांनी मिरवणुकीसाठी परवानगी मागितली आहे.

मंडळांच्या पदाधिकार्‍यांसोबत बैठक
मंडळांच्या पदाधिकार्‍यांसोबत कोतवाली पोलिस ठाण्यात बैठक पार पडली. यावेळी पोलिस प्रशासनाने काही सूचना मंडळांना केल्या. अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे, कोतवाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, तोफखाना पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.

तडीपार समाजकंटक
कोतवाली – 68, तोफखाना – 75,
भिंगार – 95, नगर तालुका – 19,
जिल्ह्यातील पोलिस बंदोबस्त
अतिरिक्त पोलिस अधीक्षक – 2,
पोलिस उपअधीक्षक – 8, निरीक्षक – 33,

सहायक पोलिस निरीक्षक – 105,
पोलिस कर्मचारी – 1775,
एकूण -1924

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news