रत्‍नागिरी : मुरुड किनाऱ्यावरून ६९ लाखाचं चरस जप्त

file photo
file photo
Published on
Updated on

जालगाव ; पुढारी वृत्‍तसेवा दापोली तालुक्यामधील मुरुड खालची पाखाडी येथून सुमारे 69 लाख 2 हजार रुपये किमतीचा चरस (हशिश) दापोली पोलिसांनी जप्त केले. ही घटना 14 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा घडकिस आली.

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरुड खालची पाखाडी येथे संशयितरित्या बेवारस बॅग आढळून आली. सदर बॅगची तपासणी केली असता, त्यामध्ये 15 पिशव्या आढळून आल्या. या प्रत्येक पिशवीत सरासरी एक किलो तीनशे ग्रॅम वजनाचे चरस (हशिश) आढळून आले. सदर मालाचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मूल्य हे सुमारे 69 लाख रुपये असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. हे चरस असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

या बाबत अज्ञात इसमाविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, या घटनेचा अधिक तपास दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक आयरे करीत आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news