Vaibhavwadi Bus Accident: वैभववाडीत ST बस 200 फूट दरीत कोसळली; एका झाडामुळे अनर्थ टळला,अन्यथा बस धरणाच्या पाण्यात बुडाली असती

Aruna Dam: झाडाला धडकून बस थांबल्याने मोठा अनर्थ टळला; चालक-वाहकांसह १२ प्रवासी किरकोळ जखमी
Vaibhavwadi Bus Accident
Vaibhavwadi Bus AccidentPUDHARI
Published on
Updated on

वैभववाडी :पुढारी वृत्तसेवा

कणकवली आगाराची कणकवली-मौदे ही एसटी बस अरुणा धरणानजीक भोम गवळवाडी हद्दीत सुमारे २०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. शुक्रवारी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. बस दरीत कोसळताना एका झाडाला धडकून थांबली अन्यथा धरणाच्या पाण्यात गेली असती तर मोठा अनर्थ घडला असता. या अपघातात चालक, वाहकांसह बसमधील १२ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Vaibhavwadi Bus Accident
Kolhapur-Vaibhavwadi Railway Line | आता नेमके कसले सर्वेक्षण करणार?

कणकवली आगाराची कणकवली-मौदे वस्तीची बस चालक युवराज बंडा पाटील हे मौदे येथे घेऊन जात होते. बसमध्ये एकूण १२ प्रवासी होते. अरुणा धरणाच्या रिंग रोडवरील एका अवघड वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल दरीत कोसळली. विशेष म्हणजे बस दरीत कोसळताना पलटी झाली नाही. खाली जाताना एका झाडाला बस धडकली आणि तेथेच ती थांबली. अन्यथा बस थेट धरणाच्या पाण्यात जाण्याची शक्यता होती. बस पाण्यात गेली असती तर मोठा अनर्थ घडला असता.अपघातानंतर वाहक व प्रवाशांनी  प्रसंगावधान राखत बसचा दरवाजा उघडून एकमेकांना आधारदेत सुरक्षितपणे बाहेर आले.

Vaibhavwadi Bus Accident
Kolhapur Vaibhavwadi Railway Project | कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गासाठी आणखी किती सर्वेक्षणे हवीत?

याठिकाणी मोबाईल नेटवर्क सुद्धा नसल्याने मदतीसाठी कोणाला बोलावणे सुद्धा शक्य नव्हते. रात्रीचा अंधार, किर्र जंगल झाडी यातून एक मेकाला धरून कसेबसे जिवाच्या आकांताने सर्वजन दरीतून वर रस्त्यावर आले.  याचदरम्यान या रस्त्यावरून जाणाऱ्या एका खासगी वाहनाला थांबवून सर्व प्रवासी मौदे येथे आपल्या घरी गेले. या अपघाताची माहिती खासगी वाहनचालक आनंद जामदार यांनी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे यांना दूरध्वनीवरून दिली. रावराणे यांनी तातडीने वैभववाडी पोलिस ठाणे तसेच एसटी विभागाला अपघाताची माहिती दिली.

Vaibhavwadi Bus Accident
Nashik Old CIDCO to Panchavati-Nimani Citylink bus service - सिडकोकरांचा प्रवास पुन्हा रखडला! सिटीलिंक बससेवा ८ महिन्यांपासून बंद

माहिती मिळताच वैभववाडी पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर, पोलिस हवालदार शैलेश कांबळे, किरण मेथे, मनोज कांबळे आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मौदे येथे जाऊन जखमी प्रवाशांची विचारपूस केली. स्थानिक डॉक्टरांनी जखमींवर प्राथमिक उपचार केले. चालक युवराज पाटील आणि वाहक यांना पोलिसांच्या वाहनातून वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच एसटीचे विभाग नियंत्रक श्री. घोडे, अधिकारी श्री. देशमुख, निलेश लाड, डेपो व्यवस्थापक श्रीमती जाधव, श्रीनिवास कदम, बाबू मुळदे आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मौदे येथे जाऊन जखमी प्रवाशांची विचारपूस केली. शनिवारी दुपारपर्यंत एसटी बस दरीतच होती. बस बाहेर काढण्यासाठी एसटी प्रशासनाकडून कार्यवाही सुरू होती.

Vaibhavwadi Bus Accident
ST NCMC Card : एसटी कंडक्टरच करणार एनसीएमसी कार्ड रिचार्ज

दरम्यान सदर बसचा चालक युवराज पाटील यांनी मद्यप्राशन करून गाडी चालवण्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे तर वैभववाडी पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयाला पत्र देऊन सदरचालकाची मद्यप्राशन केले आहे किंवा नाही याबाबत चाचणी करण्याची मागणी केली आहे.

याच वळणार गेल्यावर्षी सुद्धा एस टी दरडीच्या बाजूला गटारात कलंडून अपघात झाला होता. याठिकाणी रस्ता रुंदीकरण करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news