Nashik Old CIDCO to Panchavati-Nimani Citylink bus service - सिडकोकरांचा प्रवास पुन्हा रखडला! सिटीलिंक बससेवा ८ महिन्यांपासून बंद

Old CIDCO to Panchavati-Nimani Citylink bus service - बस तत्काळ सुरू करण्याची जुने सिडकोवासीयांकडून मागणी
City Bus Services
सिटीलिंक बससेवा, www.pudhari.newsFile Photo
Published on
Updated on

सिडको : जुने सिडको परिसरातून पंचवटी - निमाणीकडे जाणारी सिटीलिंक बससेवा सुमारे आठ महिन्यांपासून बंद असल्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण होऊनही बससेवा अद्याप सुरू केलेली नसल्यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार तसेच सर्वसामान्य प्रवाशांना रिक्षाने अधिक पैसे मोजून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेने उत्तमनगर विजयनगर महाराणा प्रताप चौक -सावरकर चौक छत्रपती शिवाजी चौक लेखानगरमार्गे पंचवटी निमाणीपर्यंत सिटीलिंक बससेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पूर्वी सिम्बायोसिस कॉलेज, उत्तमनगर, विजयनगर, दत्त चौक, महाराणा प्रताप चौक, सावरकर चौक, छत्रपती शिवाजी चौक, शॉपिंग सेंटर, लेखानगरमार्गे निमाणी, पंचवटीपर्यंत नियमित बससेवा सुरू होती. मात्र लेखानगर ते छत्रपती शिवाजी चौक या दरम्यानच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामामुळे नोव्हेंबर महिन्यापासून ही बससेवा बंद केली होती. दरम्यान, संबंधित रस्त्याचे काम पूर्ण होऊन वाहतूक सुरळीत सुरू झाली असूनही बससेवा पुन्हा सुरू झालेली नाही. त्यामुळे शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नोकरीसाठी शहरात ये-जा करणारे कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना दररोज आर्थिक भुर्दंड सहन करावा लाग लागत आहे. सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना खासगी वाहन किंवा रिक्षावर अवलंबून राहावे लागत असून, त्याचा थेट परिणाम त्यांच्या मासिक खर्चावर होत आहे.

उत्तमनगर - विजयनगर महाराणा प्रताप चौक सावरकर चौक छत्रपती शिवाजी चौक लेखानगर मार्गे पंचवटी - निमाणीपर्यंत पूर्ववत सिटीलिक बसर त्वरित सुरू करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी गणेश चिंचोरे, विजय कपिले, प्रसाद जाधव, सचिन बोरसे, दीपक नेरकर, गणेश वझरे, विशाल मुसळे, वाल्मीक बोरसे, रवींद्र पवार आणि प्रकाश ओगले यांनी महानगरपालिकेकडे केली आहे

प्रवाशांशी गैरवर्तन; बस ऑपरेटर कंपनीसही दंड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महानगर परिवहन महामंडळ अर्थात सिटीलिंकच्या बससेवेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात ऑगस्ट महिन्यात व्यापक कारवाई करण्यात आली. दि. १ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत तपासणीदरम्यान विनातिकीट प्रवास करणारे २८४ प्रवासी आढळून आले. त्यांच्याकडून १४ हजार ३२९ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

शहर तसेच शहराच्या हद्दीपासून २० किलोमीटरपर्यंत सिटीलिंककडून सार्वजनिक बससेवा पुरविली जाते. प्रवाशांना सुरक्षित आणि सुरळीत सेवा देताना बससेवेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांबरोबरच तिकीट देण्याच्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या वाहकांवरही कारवाई करण्यात आली. ऑगस्ट महिन्यात वाहकांच्या कर्तव्यातील कसुरची २६२ प्रकरणे समोर आली. त्यात प्रवाशांकडून पैसे घेऊन तिकीट न देण्याची १२ प्रकरणे, पैसे न घेता तिकीटही न देण्याची २५० प्रकरणे आढळली. संबंधित वाहक एजर्सीकडून या प्रकरणांत ३० हजार ४९३ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय प्रवाशांशी गैरवर्तन करणे, बसथांब्यावर बस न थांबविणे, निर्धारित मार्गाऐवजी अन्य मार्गाने बस चालविणे, मद्यप्राशन करीत कर्तव्य बजावणे आणि नियोजित वेळेपूर्वी बस मार्गस्थ करणे अशी १७० प्रकरणे निदर्शनास आली. यात संबंधित एजन्सींवर २ लाख ५२ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

तिकीट घेऊनच प्रवास करा

सिटीलिंक प्रशासनाने प्रवाशांना प्रवासाचे योग्य भाडे अदा करत वाहकाकडून तिकीट घेण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक प्रवाशाला तिकीट देऊनच प्रवासास अनुमती देणे ही वाहकांची जबाबदारी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. चालक अथवा वाहकांबाबत कोणतीही तक्रार असल्यास प्रवाशांनी सिटीलिंकच्या अधिकृत हेल्पलाइन, मोबाइल अॅप्लिकेशन, संकेतस्थळ, ई -मेल किंवा सिटीलिंक कार्यालयात तक्रार नोंदवावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

जुने सिडको प्रभाग क्रमांक २४ भागातून सिटीलिंक बससेवा पूर्ववत सुरू करावी, यासाठी सिटीलिंक बसचे व्यवस्थापक यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार आहे.

- पल्लवी राहुल गणोरे, नगरसेविका

City Bus Services
Boat accident Death | मालवणजवळ कर्ली खाडीत होडी उलटून दुर्घटना; गणेशोत्सवासाठी सासुरवाडीला आलेला तरुण बेपत्ता!

जुने सिडको भागातून सिटीलिंक बस बंद असल्याने विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक महिला व नोकरदारांचे हाल होत आहेत.

- गणेश चिंचोरे, सामाजिक कार्यकर्ते

City Bus Services
Lasalgaon Onion Market | पूर्वीचा ग्राहक आता बनला प्रतिस्पर्धी! नाशिकच्या कांदा उत्पादकांपुढे बांगलादेशचे मोठे आव्हान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news