कोकण रेल्वेचे उद्यापासून पावसाळी वेळापत्रक; गाड्यांच्या वेळात बदल

कोकण रेल्वेचे उद्यापासून पावसाळी वेळापत्रक; गाड्यांच्या वेळात बदल
Published on
Updated on

कणकवली : पुढारी वृत्तसेवा :  कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांसाठी १० जून ते ३० ऑक्टोबर या कालावधीसाठी पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. कोकणात पडणारा मुसळधार पाऊस व डोंगरदऱ्यांमधून कोकण रेल्वे मार्ग जात असल्याने दरडींचा धोका उद्भवू नये यासाठीची काळजी म्हणून रेल्वे प्रशासनाकडून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पावसाळी वेळापत्रक जाहीर केले आहे. नवीन वेळापत्रकानुसार गाड्यांच्या वेळात बदल करण्यात आला असून धावणाऱ्या गाडांचा वेगही मंदावणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या व मुंबईहून मडगावच्या दिशेने धावणाऱ्या गाड्यांसाठी हे वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. कोकण रेल्वेकडून गेली अनेक वर्षे हे वेळापत्रक लागू केले जाते. गाड्यांचा वेग कमी करून कोकण रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित करण्याच्यादृष्टीने ही उपाययोजना महत्वाची आहे. कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात दरडी येण्याची शक्यता असते.

त्यादृष्टीने रेल्वे मार्गावर ट्रॅकमनची गस्त वाढविण्यात येते. गाड्यांचा वेग कमी करतानाच वेळापत्रकातही बदल केला असून त्याची अंमलबजावणी सोमवार १० जून पासून सुरू होणार आहे.

कोकणकन्या एक्स्प्रेस मुंबईकडे जाणारी

कोकणकन्या एक्सप्रेस मडगाव येथून सायंकाळी ६ वा. सुट्टणार असून सावंतवाडी ७.३२, कुडाळ ७.५४, सिंधुदुर्गनगरी ८.०६, कणकवली ८.२६, वैभववाडी ८.५८ तर मुंबईहून मडगावच्या दिशेने येणारी ही गाडी वैभववाडी सकाळी ७.२२, कणकवली ७.५६, सिंधुदुर्गनगरी ८.१२, कुडाळ ८.२६, सावंतवाडी येथे ८.४८ वा. पोहोचणार आहे.

तुतारी एक्स्प्रेस ही गाडी सावंतवाडी येथून सायं. ५.५५ वा. सुटणार असून कुडाळ ६.१४, सिंधुदुर्गनगरी ६. २६, कणकवली ६.४६, नांदगाव ७.०४, वैभववाडी ७.२० तर मुंबईहून येणारी ही गाडी वैभववाडी येथे सकाळी ९. ३८ वा., नांदगाव ९.५६, कणकवली १०.१४, सिंधुदुर्ग १०.३६, कुडाळ १०.५० व सावंतवाडी येथे १२.३० वा. पोहोचणार आहे.
मांडवी एक्सप्रेस-मुंबईच्या दिशेने जाणारी मांडवी एक्सप्रेस मडगाव येथून सकाळी ८.३० वा. सुटणार असून सावंतवाडी १०.०२, कुडाळ १०.२२, सिंधुदुर्ग १०.३८, कणकवली ११ वा. व वैभववाडी येथून ११.३० वा. सुटणार आहे. मुंबईहून येणारी ही गाडी वैभववाडी येथे सायं. ४.५६, कणकवली ५.३०, सिंधुदुर्गनगरी ६, कुडाळ ६.१४व सावंतवाडी येथे ७ वा. पोहोचणार आहे.

जनशताब्दी एक्स्प्रेस-मुंबईच्या दिशेने जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस मडगाव येथून दुपारी १२ वा. रवाना होणार असून सावंतवाडी १.१६ वा., कुडाळ १.३०, कणकवली २.३० तर मुंबईहून येणारी ही गाडी कणकवली स्टेशनवरून दुपारी १.२६, कुडाळ २ वा. व सावंतवाडी स्टेशनवरून २.२० वा. सुटणार आहे.

तेजस एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने जाणारी तेजस एक्सप्रेस मडगाव येथून दुपारी १२.५० वा. सुटणार असून कुडाळ २.४४ तर मुंबई छ. शिवाजी महाराज टर्मिनस येथून हून सकाळी ५.५० वा. सुटणारी गाडी कुडाळ येथे दु. २.३० वा. पोहोचणार आहे. ही गाडी मुंबई सीएसटीएम येथून दर मंगळवार, गुरूवार आणि शनिवारी सुटणार आहे. तर परतीसाठी मडगाव येथून दर बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी धावणार आहे.

दिवा पॅसेंजर एक्स्प्रेस-दिवा येथून सकाळी ६.२५ वा. सुटणारी गाडी खारेपाटण रोडला दुपारी ३.४५ वा., वैभववाडी ३.५४, आचिर्णे ४.०६, नांदगाव ४. १६, कणकवली ४.३३, सिंधुदुर्गनगरी ४.५०, कुडाळ ५.१०, झाराप ५.३१, सावंतवाडी ६.३० वा. पोहोचणार आहे. तर सावंतवाडी येथून स. ८.१५ वा. सुटणारी गाडी झाराप ८. २६, कुडाळ ८.३८, सिंधुदुर्ग ८.५०, कणकवली ९.१०, नांदगाव ९.३२, आचिर्णे ९.४३, वैभववाडी ९.५५, खारेपाटण रोड १०.०६ गाडी पोहोचणार आहे.

तर दिवा येथे रात्री ८.१० वा. ही लाखों 20% रेपल अडुलस एलटीटी मडगाव एक्स्प्रेस- मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसवरून रात्री १२.४५ वा. सुटणारी गाडी कणकवलीत सकाळी १० वा., सावंतवाडी ११ वा. तर मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी मडगाव येथून सकाळी ११.३० वा. ही गाडी सुटणारी ही गाडी सावंतवाडी १२.५०, कणकवली १.४८
वा. सुटणार आहे.

राजधानी एक्सप्रेस कुडाळ स्थानकातून सकाळी ९.५२ वा. सुटणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही सीएसटीएम येथून दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सुटणार आहे. तर परतीसाठी ही गाडी मडगाव येथून दर मंगळवार, गुरूवार आणि शनिवारी सुटणार आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news