Lok Sabha Election : रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात अकरा वाजेपर्यंत 21.19% मतदान | पुढारी

Lok Sabha Election : रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात अकरा वाजेपर्यंत 21.19% मतदान

सिंधुदुर्ग : पुढारी वृत्‍तसेवा लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात दुपारी अकरा वाजेपर्यंत 21.19% एवढे मतदान झाले आहे. तर सकाळच्या सत्रात सात ते नऊ या कालावधीत केवळ 8.29 % एवढेच मतदान झाले होते.

सकाळी नऊ वाजल्यानंतर सर्वच मतदान केंद्रांवर गर्दी दिसत असून, मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत या मतदारसंघात एकूण 21.19% एवढे मतदान झाले होते, यात चिपळूण 24.18, रत्नागिरी 15, राजापूर 23.63%, कणकवली 22.9, कुडाळ 21.4 तर सावंतवाडी 21.74% एवढे मतदान झाले आहे.

हेही वाचा : 

Back to top button