सिंधुदुर्गातील ५८१ शाळा बंद होणार ही अफवा: दीपक केसरकर | पुढारी

सिंधुदुर्गातील ५८१ शाळा बंद होणार ही अफवा: दीपक केसरकर

सावंतवाडी, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील 581 शाळा बंद होणार, हे चुकीची माहिती आहे. एकही शाळा बंद होणार नाही, शाळा बंद होणार आणि बार ना परवानगी देणार, अशा अफवा पसरवली जात आहे. ही अफवा कोण पसरवतो माहित नाही, अशा अफवा पसरवू नये, असे आवाहन राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केले. ते आज (दि.२७) सावंतवाडी दौऱ्यावर आले आहेत.

ते पुढे म्हणाले की, शाळेबाबतचा सर्व्हे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारण शाळेमध्ये किती मुले आहेत. त्यांना चांगले शिक्षण देता येण्याकरिता हा सर्व्हे आहे. एका शाळेमध्ये दोन तीन मुले असतील तर ती एकत्र खेळूही शकत नाहीत.

बऱ्याचशा कंपनीचा सीएसआर निधी आरोग्य किंवा शिक्षणावर खर्च करतात. हे सर्व पैसे एनजीओकडे जातात, मग ते शिक्षणामध्ये नवनवीन प्रयोग करतात, याचा कुठलाही फायदा विद्यार्थ्यांना होत नाही, त्यामुळे या पैशाचा वापर जुन्या झालेल्या शाळांच्या दुरुस्ती तसेच विविध शाळांच्या कामांसाठी कंपन्या देऊ शकतात, यासाठी सर्व्हे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शाळा बंद होणार असल्याची चुकीची माहिती पसरवली जात असून कोणताही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

हा शिक्षणावर खर्च होणारा पैसा केवळ व्हिडिओ, पत्रके छापणामध्ये खर्च केला जाऊ नये या ऐवजी मुलांना चांगल्या टॉयलेट,शाळेला कंपाउंड वॉल,चांगल्या ब्रेचेस चांगली इंटरनेट सुविधा, टीव्ही कॉम्प्युटर लॅब देता आल्या तर त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यामुळे शाळा बंद होण्याबाबतच्या कोणत्या प्रकारच्या अफवा पसरवल्या जाऊ नयेत असे आवाहन त्यांनी केले आहे.

माणगाव खोऱ्यातील दोन युवकांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी तातडीने मदत देणार

सावंतवाडी शहरात झाड कोसळून झालेला प्रसंग अत्यंत दुर्दैवी आहे. येत्या दोन दिवसांमध्ये मृतांच्या नातेवाईकांना शासकीय आणि व्यक्तिगत मदत दिली जाईल. केवळ पैसे दिल्याने दुःख दूर होत नाही, त्या कुटुंबाला दिलासा दिला गेला पाहिजे कारण ही तरुण मुले आहेत. मदत आणि पुनर्वसन विभागाला याबाबत कल्पना दिली जाईल. तसेच झाडांच्या धोकादायक फांद्या छाटल्या जातील. या झाडांचा सर्व्हे केला जाईल. शहरामध्ये वीज महावितरणच्या जिवंत लाईनवर झाडे आणि त्याच्या फांद्या आलेले आहेत, याची चौकशी करण्याचे आदेश दिले जातील, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button