रत्नागिरी : पुराचा फटका बसलेल्या चांदेराई गावाची मंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी | पुढारी

रत्नागिरी : पुराचा फटका बसलेल्या चांदेराई गावाची मंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : मुसळधार पावसामध्ये काजळीमध्ये झालेल्या पुरामुळे गेले 36 तास पाण्यात राहिलेला चांदीराई गावाला राज्याचे उद्योग मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली व ग्रामस्थांशी चर्चा केली. दुकानदाराला प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. टपरीवाले आहेत त्यांना दहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

७७ दुकानांमध्ये पाणी शिरले

यावेळी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की सुमारे ७७ दुकानांमध्ये पाणी शिरले होते. २ दिवस पाणी दुकान व परिसरात राहिलेले होते. त्यामुळे प्रत्येक दुकानदाराला प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. टपरीवाले आहेत त्यांना दहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्या ठिकाणी जमीन खाचण्याच्या घटना घडल्या आहेत त्यांची देखील पाहणी करण्याच्या सूचना प्रांताधिकारी यांना दिल्या आहेत. चांदेराई नदीमधिल गाळ जास्तीत जास्त काढण्यात यावा अशी ग्रामस्थांची जी मागणी होती त्या मागणी नुसार जिल्हा नियोजन समिती मधून निधीची तरतूद करून सगळा गाळ काढण्यात येईल असे निर्णय घेण्यात आले. असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

हेही वाचा 

Back to top button