रत्नागिरी : चिपळूणसाठी स्वतंत्र गणपती स्पेशल मेमू अनारक्षित रेल्वे धावणार!
रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा आगामी गणेशोत्सवासाठी चिपळूणपर्यंत दिवा ते चिपळूण मार्गावर दि. 13 सप्टेंबरपासून 3 ऑक्टोबर 2023 पर्यंत मेमू स्पेशल गाडी चालवण्यात येणार आहे. पूर्णपणे अनारक्षित असलेल्या या गाडीमुळे मुंबईहून गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दिनांक 13 सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर 2023 या कालावधीत युवा चिपळूण मेमू स्पेशल गाडीच्या एकूण 36 फेऱ्या होणार आहेत. दिवा ते चिपळूण मेमू स्पेशल 01155/01156 गाडी दिवा येथून सात वाजून 45 मिनिटांनी सुटून चिपळूणला ती एक वाजून 25 मिनिटांनी पोहोचणार आहे.
चिपळूणला आलेली मेमू स्पेशल गाडी दुसऱ्या दिवशी दिनांक 14 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2023 या कालावधीत दुपारी १ वाजता सुटून रात्री सात वाजता ती दिवा जंक्शनला पोहोचेल.
असे असतील दिवा चिपळूण मेमू स्पेशल गाडीचे थांबे
पनवेल, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव, वीर, सापेवामने, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी, खेड तसेच अंजनी ही आठ डब्यांची गाडी असेल. पूर्णपणे अनारक्षित असलेल्या या गाडीमुळे नियमित तसेच विशेष गाड्यांचे कन्फर्म आरक्षण न मिळाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा :