

पुढारी ऑनलाइन डेस्क : Mumbai BJP Protest : समृद्धी महामार्गावरील बुलढाणाजवळ खासगी बसच्या झालेल्या भीषण अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. आजचा दिवस दुःखाचा आहे. त्यामुळे या संपूर्ण घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आज होणारे भाजप आणि महायुतीचे "आक्रोश आंदोलन" आज न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, अशी माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी दिली आहे.
आशिष शेलार यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. आशिष यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,
बुलढाण्यातील अत्यंत वेदना देणाऱ्या अपघाताच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. दु:खाचा.डोंगर कोसळेल्या कुटुंबासोबत आमच्या ही सहवेदना! स्वतः मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांनी सुद्धा शोकभावना व्यक्त केल्या आहेत. तर मा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घटनास्थळी पोहोचत आहेत.
या संपूर्ण घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आज होणारे भाजप आणि महायुतीचे "आक्रोश आंदोलन" आज न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आजचा दिवस दुःखाचा आहे, आज आम्ही काही बोलणार नाही. पण मुंबईकरांना लुटणाऱ्यांकडे हिशेब मात्र यापुढे ही मागतच राहू!