छत्रपती संभाजी महाराज 'धर्मवीरच' : आमदार भरत गोगावले

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या दोन दशकांच्या कार्यामध्ये हिंदवी स्वराज्य वाढवण्याचे काम केले. औरंगजेबाने धर्म बदलावा यासाठी जाच केला. मात्र, त्यांनी धर्माचा त्याग केला नाही. यामुळेच छत्रपती संभाजी महाराज हे ‘धर्मवीर’च होते, असे मत महाडचे आमदार भरत गोगावले यांनी शुक्रवारी (दि.२७) किल्ले रायगडावर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३४१ व्या राज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले. याप्रसंगी शिवभक्त मिलिंद एकबोटे यांनी प्रतापगडावरील अनधिकृत बांधकामासंदर्भात राज्यातील शासनाने केलेली कारवाई गौरवास्पद असल्याचे मत व्यक्त केले.
गेल्या काही वर्षापासून महाड मधील संभाजी महाराज राज्याभिषेक समितीमार्फत आयोजित करण्यात आलेला हा सोहळा उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला. गुरुवारी रात्रीपासूनच किल्ले रायगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन संयोजकांमार्फत करण्यात आले होते. आज सकाळी झालेल्या प्रमुख कार्यक्रमात आमदार भरत गोगावले, शिवभक्त मिलिंद एकबोटे, यांसह महाड शिवसेना संपर्कप्रमुख प्रमुख सिद्धेश पाटेकर, शहर युवासेना प्रमुख सिद्धेश मोरे, सुभाष मोरे डॉ. चेतन सुर्वे यांसह तालुक्यातील विविध आजी-माजी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचलंत का?
- IND vs NZ 1st T20 : कुलदीप यादवमुळे चहलचा पत्ता कट? जाणून घ्या कोणाला मिळणार संधी
- Angry Ranbir : माँ का लाडला बिगड गया! रणबीरने फॅन्सचा फोन दिला फेकून (Video)
- Chandrashekhar Bawankule | …त्यावेळी शरद पवारांनी शकुनीमामाचे काम केले का ? : चंद्रशेखर बावनकुळे