Gas Cylinder Blast : शक्‍तिशाली स्‍फोटाने रत्‍नागिरी हादरली; दोन महिलांचा मृत्‍यू | पुढारी

Gas Cylinder Blast : शक्‍तिशाली स्‍फोटाने रत्‍नागिरी हादरली; दोन महिलांचा मृत्‍यू

रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा शहरातील उद्यमनगर भागातील शेट्ये नगर येथील आशियाना सहकारी गृह निर्माण संस्‍थेचा परिसर आज (बुधवार) पहाटे शक्तिशाली स्फ़ोटाने (Gas Cylinder Blast) हादरला. रत्नागिरी शहरात एक ते दीड किलोमीटर परिसरात हा स्फोटाचा आवाज ऐकू आला. या परिसरातील अनेक घरांच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या. या परिसरात राहणाऱ्या अशफक काझी यांच्या घरात आज (बुधवार) पहाटे गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यानंतर घराला आग लागली. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, यात घराचा काही भाग कोसळला तर, आगीने रौद्ररूप धारण केले. या घटनेमध्ये मायलेकींचा मृत्यू झाला, तर बाप,लेक गंभीररीत्‍या भाजले आहेत.

या आगीत (Gas Cylinder Blast) घरातील दोन महिलांसह चार जण अडकले. याची माहिती मिळताच शहर पोलिसांसह रत्नागिरी नगर परिषदेचे अग्निशमन यंत्रणा, एम. आय. डी. सी येथील अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ रेस्क्यू ऑपेरेशन ला सुरुवात केली. यातील अशाफक काझी आणि त्यांचा मुलगा अम्मार काझी याला बाहेर काढून तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र घरातील दोन्ही महिला ढीगऱ्याखाली अडकल्या होत्या. त्यांच्या अंगावर भिंत कोसळली होती. त्यांना बाहेर काढण्यासाठी जेसीबी मागवण्यात आला. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर दोघीना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. दोघींचीही अवस्था गंभीर होती. दोघींनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात दखल करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी हेही (Gas Cylinder Blast) घटनास्थळी दखल झाले. पोलिसांसह फॉरेन्सिक टीम सुद्धा घटनास्थळी दाखल झाली होती. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनीही मोलाची मदत केली.

हा स्फोट खूपच शक्तिशाली होता, यामुळे आजूबाजूच्या घरांचेही खूप नुकसान झाले आहे. (Gas Cylinder Blast) अनेकांच्या घराच्या काचा फुटल्या आहेत. या घटनेचा तपास शहर पोलिसांनी सुरु केला आहे.

हेही वाचा : 

Back to top button