कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आठ उमेदवार रिंगणात; शिक्षक परिषदेचे वेणुनाथ कडू यांची माघार | पुढारी

कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आठ उमेदवार रिंगणात; शिक्षक परिषदेचे वेणुनाथ कडू यांची माघार

खेड शहर, पुढारी वृत्तसेवा : कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या सोमवारी शेवटच्या दिवशी एकूण 13 उमेदवारांपैकी 5 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे या मतदार संघात आठ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणुकीसाठी एकूण 13 उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज वैध ठरवून स्वीकृत करण्यात आले होते. त्यापैकी शिक्षक परिषदेचे कडू वेणुनाथ विष्णु, घोन्साल्वीस जिमी मतेस (अपक्ष), बळीराम परशुराम म्हात्रे (अपक्ष), बाळाराम गणपत पाटील (अपक्ष), ज्ञानेश्वर पुंडलिक म्हात्रे (अपक्ष) या पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे कोकण शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या आठ झाली आहे. म्हात्रे ज्ञानेश्वर बारकु (भाजप), धनाजी नानासाहेब पाटील (जदयु), उस्मान इब्राहिम रोहेकर (अपक्ष), तुषार वसंतराव भालेराव (अपक्ष), देवरुखकर रमेश नामदेव (अपक्ष), बाळाराम दत्तात्रेय पाटील (अपक्ष), प्रा.सोनवणे राजेश संभाजी (अपक्ष), संतोष मोतीराम डामसे (अपक्ष) यांच्यामध्ये लढत होणार आहे.

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान सोमवारी (दि.30) सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत होणार आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा कोकण विभागाचे उपायुक्त (सामान्य) मनोज रानडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Back to top button