रत्नागिरी : जुन्या पेन्शन योजनेच्या लाभासाठी कर्मचार्‍यांची दुचाकी रॅली | पुढारी

रत्नागिरी : जुन्या पेन्शन योजनेच्या लाभासाठी कर्मचार्‍यांची दुचाकी रॅली

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासकीय तसेच निमशासकीय कर्मचाऱ्यांनी आज रत्नागिरीत दुचाकी रॅली काढून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. एकच मिशन जुनी पेन्शन अशा घोषणा देत ही रॅली सकाळी सव्वा अकराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली.

देशातील काही राज्यांमध्ये शासकीय तसेच निमशासकीय कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कर्मचारी त्यासाठी मागील काही वर्षांपासून संघर्ष करत आहेत. तरीही शासनाने याची दखल घेतली नाही. यामुळे आज याविरोधात  कर्मचाऱ्यांनी  जिल्हाधिकारी कार्यालयावर दुचाकी रॅली काढत प्रशासनाला आंदोलन सूचक इशारा दिला.

कुवारबाव येथील सामाजिक न्याय भवन इथून सुरू झालेली कर्मचार्‍यांची दुचाकी रॅली एकच मिशन जुनी पेन्शन, अशा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली. प्रशासनाने आपल्या मागणीचा विचार केला नाही तर भविष्यात  मोठे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिला. या दुचाकी रॅलीत विविध संघटनांनी सहभाग घेतला होता.

हेही वाचलंत का ?

Back to top button