रायगड : रोह्यात पोलिस दलाच्यावतीने स्वातंत्र्याची अमृतमहोत्सवी दौड (Video) | पुढारी

रायगड : रोह्यात पोलिस दलाच्यावतीने स्वातंत्र्याची अमृतमहोत्सवी दौड (Video)

रोहा; पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार ‘हर घर तिरंगा’ व स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी दौड हा कार्यक्रम रोह्यात पार पडला. रायगडचे पोलिस अधीक्षक अशोक दुधे व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड पोलिस दलाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दौड कार्यक्रमाची सुरुवात कुंडलिकानदी संवर्धन उद्यान येथून झाली. यावेळी डॉ किरणकुमार सुर्यवंशी यांनी एकता दौडसह हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी पथनाट्य सादर करण्यात आले. तसेच पोलिस बँड पथक यांनी देशभक्तीपर गीते बँड वर सादर केलीत. यावेळी रोहा पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. किरणकुमार सुर्यवंशी, पाली तहसीलदार दिलीप रायणवार, रोहा नगरपरीषद मुख्याधिकारी धीरज चव्हाण, पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर, नागोठणे पोलिस निरीक्षक विश्वजीत काईगंडे, कोलाड सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव, रोहा नायब तहसीलदार राजेश थोरे, डॉ. फरीद चिमावकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button