कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्ववत

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

खेड; अनुज जोशी : रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळल्याने ठप्प झालेली कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सायंकाळी साडेचार नंतर पूर्ववत सुरू झाली आहे. खेड तालुक्यातील अंजनी स्टेशन जवळ आज ( दि. 14  )  दुपारी दरड कोसळली होती. त्यानंतर तीन तासांहून अधिक काळ खेड स्थानकात अडकून पडलेल्या प्रवाश्यांनी मांडवी एक्स्प्रेस मार्गस्थ झाल्याने सुटकेचा श्वास घेतला.

कोकणात पावसाची संततधार सुरूच आहे. आज दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास पहिल्यांदाच कोकण रेल्वेला अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला. खेड तालुक्यातील अंजनी रेल्वे स्थानकनजीक तारेची जाळी तुटल्याने रुळावर माती व दगड कोसळले. यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आली होती. या दुर्घटनेमुळे खेड रेल्वे स्थानकात दुपारी १.१२ वाजता दाखल झालेली मांडवी एक्स्प्रेस थांबवण्यात आली होती. सायंकाळी साडेचार पर्यंत दरड बाजूला करण्याचे काम सुरू होते. दरड बाजूला केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news