मालवणच्या कलाशिक्षकाची विठ्ठल भक्‍ती; बल्‍बमध्ये साकारली ३ सेंटीमीरची मूर्ती | पुढारी

मालवणच्या कलाशिक्षकाची विठ्ठल भक्‍ती; बल्‍बमध्ये साकारली ३ सेंटीमीरची मूर्ती

मालवण ; पुढारी वृत्तसेवा : मालवण कट्टा येथील वराडकर हायस्कूलचे कलाशिक्षक समीर चांदरकर यांनी चक्क लाईटच्या बल्बमध्ये विठ्ठलाची प्रतिकृती साकारली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने समीर चांदेरकर यांनी आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मातीपासून तयार केलेली तीन सेंटीमीटर उंचीची ही मूर्ती बल्बमध्ये उतरवताना अनेक वेळा अपयश आले. परंतु मनाशी केलेल्या निर्धाराला पांडुरंगाने दिलेली साथ यामुळे ही कलाकृती पूर्ण झाली असे समीर चांदेरकर यांनी सांगितले.

यापूर्वीही चांदेरकर यांनी पिंपळाच्या पानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तांदळावर विठ्ठलाची प्रतिकूती अश्या अनेक वेगवेगळ्या कलाकृती साकारल्या आहेत. त्यांच्या कलेचा अनेक स्तरावर सन्मान झाला आहे. एकूणच समीर चांदेरकर यांच्या विठ्ठल कलाकृतीचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

हेही वाचा :  

Back to top button