ऐकावं ते नवलचं! २२ वर्षांच्या तरूणाने सावत्र आईसोबत थाटला संसार; बापाची पोलिसात तक्रार | पुढारी

ऐकावं ते नवलचं! २२ वर्षांच्या तरूणाने सावत्र आईसोबत थाटला संसार; बापाची पोलिसात तक्रार

रुद्रपूर (उत्तराखंड); पुढारी ऑनलाईन : २२ वर्षांच्या एका तरुणाने सावत्र आईसोबत संसार थाटल्याचा प्रकार रुद्रपूर येथे घडला आहे. सावत्र आईचे वय ३८ वर्षं आहे. यात ५२ वर्षांच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेतली आहे. या प्रकरणातील नवविवाहित नवरोबा आणि त्याची नव्याने झालेली पत्नी दोघेही सज्ञान असल्याने काय कारवाई करायची या पेचात पोलिस पडले आहेत. प्रेमाला कशाचे बंधन नसते असे म्हटले जाते, पण या प्रकरणामुळे उधमपूर नगर जिल्ह्यात मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे.

बोंबला! पुतीनच्या मुलीचं ‘झेलेन्स्की’बरोबर लफडं; एक मुलगीदेखील…

या प्रकरणातील वडिलांनी ११ वर्षांपूर्वी पहिल्या पत्नीच्या निधनानंतर दुसरे लग्न केले होते. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा त्यांना मारहाण करून घरातून पळून गेला. तर दुसरी पत्नी आजारी असल्याचे कारण सांगून सोबत २० हजार रुपये घेऊन माहेरी जातो असे सांगून गेली होती, ती परत आलीच नाही. काही दिवसांनी चौकशी केली असता, मुलगा आणि आईने संसार थाटल्याचे वडिलांच्या लक्षात आले.

पोलिस अधिकारी अर्जुन गिरी यांनी माध्यामांना या संदर्भात माहिती दिली. “आम्हाला या संदर्भात तक्रार मिळाली आहे. यामध्ये कोणत्या कायद्याचा भंग झाला आहे, हे आम्ही पाहात आहोत. दोघेही सज्ञान आहेत. त्यामुळे कायद्याचा भंग झाला असेल तरच कारवाई होऊ शकेल”

Back to top button