रत्नागिरी : उसणे पैसे न दिल्याने तरुणास मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

File photo
File photo

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : उधार घेतलेले साडेतीन लाख रुपये परत न दिल्याच्या रागातून तरुणास मारहाण करण्याची घटना रविवारी (15 मे) टीआरपी ते हातखंबा या मार्गावर घडली. याप्रकरणी राजू मयेकर ( रा. थिबापॅलेस रोड, रत्नागिरी ) याच्यासह दोघांविरोधात येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबबत मनोज कृष्णा सातपुते (वय 36) रा.कुवारबाव, रत्नागिरी याने पोलिसांत तक्रार दिली आहे.  मनोज याने 5 वर्षांपूर्वी राजू मयेकर याच्याकडून आंबा व्यवसायासाठी साडे तीन लाख रुपये उधार घेतले होते; पण त्याने वेळेवर पैसे परत केले नाहीत. या रागातून राजू रविवारी मनोजला टीआरपी येथुन जबरदस्तीने हातखंबा येथे घेऊन गेला. तेथे पैशांची मागणी व शिवीगाळ करत प्लास्टिक पाईप आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान, सातपुते तेथून निघून जात असताना मयकर याच्या दोन मित्रांनीही त्याला मारहाण केली. त्यानंतर पुन्हा टीआरपी येथे नेऊन मनोज याच्या मुलासमोर मोबाईल काढून घेत जाड दोरीने मानेवर, पाठीवर मारहाण केली व ठार मारण्याची धमकी दिली.

हेही वाचलंत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news