रत्नागिरी: जिल्हा परिषदेत रविवारीही कामकाज | पुढारी

रत्नागिरी: जिल्हा परिषदेत रविवारीही कामकाज

रत्नागिरी पुढारी वृत्तसेवा : दोन दिवसांवर मार्च एण्ड आल्याने अखर्चित निधी खर्च करण्यासाठी सर्वच विभागांची धावपळ वाढली आहे. त्यामुळे शनिवार व रविवारच्या सुट्टीच्या दिवशीही बांधकाम, पाणीपुरवठा, अर्थ विभाग, इत्यादी विभागातील संबंधित कर्मचारी कार्यालयात येऊन प्रलंबित कामांचा निपटारा करताना पाहायला मिळाले.

राज्य शासनाने अखर्चित निधी दिसल्यास संबंधित विभागप्रमुख व दोषी अधिकार्‍यांवर कारवाईचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने कामाची गती वाढविली आहे. त्यामुळे अखर्चितचे नियोजन करतानाच मार्च एण्डपूर्वी झालेल्या कामांची बिले तयार करून त्याच्या मंजुरीसाठी अधिकार्‍यांची धावाधाव सुरू आहे. तसेच, शासनाकडून नवीन ग्रॅन्टही मार्च अखेरीस येत असल्याने अर्थ विभागातही हालचालींना वेग आला आहे.

रत्नागिरी : विजेचा धक्का बसून वायरमनचा जागीच मृत्यू

जिल्हा परिषदेतील अर्थ विभाग, बांधकाम दक्षिण व उत्तर विभाग, ल. पा., पाणीपुरवठा इत्यादी विभागातील टेंडर टेबलवरील कर्मचारी, अकौटंट व संबंधित कर्मचारी हे शनिवारनंतर रविवारीही सुट्टी न घेता जबाबदारीने झेडपीत हजर होते. त्यांनी आपल्याकडील प्रलंबित फाईल, बिले मार्गी लावण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत आपली खुर्ची सोडली नाही.

हेही वाचा

Back to top button