माझा घातपात होणार हे पोलीसच सांगताहेत : किरीट सोमय्यांचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या | पुढारी

माझा घातपात होणार हे पोलीसच सांगताहेत : किरीट सोमय्यांचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे दापोलीतील साई रिसॉर्टवर हातोडा चालविण्यासाठी निघालेले भाजप नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी रोखले आहे. त्यामुळे सोमय्यांनी दापोली पोलीस ठाण्याच्या पायऱ्यांवर आज (शनिवार) ठिय्या मारला. माझा घातपात होणार हे पोलीस सांगत आहेत. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक आणि शिवसेनेचे हे कटकारस्थान असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांना अडवले आहे. तक्रार देऊनही पोलीस एफआयआर नोंदवून घेत नाहीत. पोलीस कुणाच्या तरी सांगण्यावरून निर्णय घेत आहे. पोलीस सरकारच्या दबावाखाली काम करत आहे. पोलिसांनी सोमय्यांना साई रिसॉर्टकडे जाण्यापासून रोखले आहे. त्यामुळे सोमय्या यांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मारला असून जोपर्यंत न्याय मिळत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना पोलीस शाखा अशी पाटी लावण्याची मागणी सोमय्यांनी यावेळी केली. रत्नागिरी पोलीस अधीक्षकांची चौकशी करण्याची मागणी सोमय्यांनी केली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button