Jay Pawar: VSR प्रकरणात नवा ट्विस्ट! जय पवारांनी केली रोहित सिंहच्या अटकेची मागणी; व्हिडिओ शेअर करत काय म्हणाले?

VSR Aviation Controversy: जय पवार यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत VSR कंपनीचे मालक रोहित सिंह यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. उड्डाणादरम्यान मुख्य पायलटच्या सीटवर झोपल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Jay Pawar VSR Aviation Controversy
Jay Pawar VSR Aviation ControversyPudhari
Published on
Updated on

Jay Pawar Shares Viral Video Alleging Negligence by VSR Owner Rohit Singh During Flight:

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर विमान सुरक्षा आणि संबंधित कंपनीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच जय पवार यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. दिवंगत नेते अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत VSR कंपनीचे मालक रोहित सिंह यांच्यावर थेट कारवाईची मागणी केली आहे.

जय पवार यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये असा दावा केला आहे की, व्हिडिओमध्ये रोहित सिंह हे उड्डाणादरम्यान मुख्य पायलटच्या सीटवर झोपलेले दिसत आहेत. विमान हवेत असताना असा निष्काळजीपणा गंभीर असून प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळ करणारा आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. मात्र हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे किंवा कोणत्या उड्डाणाशी संबंधित आहे, याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.

पोस्टमध्ये जय पवार यांनी आपल्या वडिलांच्या निधनाचा उल्लेख करत भावनिक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे (DGCA) तातडीने चौकशी करण्याची आणि कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे.

Jay Pawar VSR Aviation Controversy
Jay Pawar Emotional Post: “डॅड, काश वेळ थांबली असती…” : अजित पवारांच्या आठवणीत जय पवारांची भावनिक पोस्ट

जय पवार म्हणाले की, चौकशी पूर्ण होईपर्यंत VSR कंपनीची सर्व विमाने तात्पुरती ग्राउंड करण्यात यावीत. तसेच, संबंधित प्रकरणात रोहित सिंह यांना अटक करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जय पवार काय म्हणाले?

''माझ्या वडिलांना आपण गमावले… ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे. या व्हिडिओमध्ये VSR चे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही. हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे.

मी DGCA ला ठामपणे मागणी करतो — या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई व्हावी. संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSR ची सर्व विमाने तात्काळ ग्राउंड करण्यात यावीत आणि रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ही एका मुलाची आर्त हाक आहे… माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी''

दरम्यान, या व्हिडिओची सत्यता, त्याची वेळ आणि संदर्भ याबाबत अधिकृत स्तरावर कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. VSR कंपनीकडूनही यासंदर्भात अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. प्रकरणामुळे विमान सुरक्षेच्या नियमांवर आणि चार्टर सेवांवरील देखरेखीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. आता DGCA या आरोपांकडे कशा पद्धतीने पाहते आणि पुढील कारवाई काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news