जालना हादरले! चार मुलांसह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या - पुढारी

जालना हादरले! चार मुलांसह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

जालना (वडीगोद्री) : पुढारी वृत्‍तसेवा

चार मुलासह आईची विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना घुंगर्डे हादगाव ता. अंबड येथे (गुरुवार) रात्री घडली. सरत्या वर्षाच्या आज (शुक्रवार) सकाळी ९ वाजता ही घटना उघडकीस आली. चार मुलांसह विवाहितेने आत्महत्या केली असून, मृतांमध्ये एक मुलगा तीन मुलींचा समावेश आहे.

घुंगर्डे हादगाव शिवारातील गट नंबर ९३ मधील शेतातील विहिरीत या महिलेने मुलांसह उडी घेऊन आत्महत्या केली असून, मृतांमध्ये गंगासागर ज्ञानेश्वर आडाणी (वय ३०), भक्ती ज्ञानेश्वर आडाणी (वय १२), ईश्वरी ज्ञानेश्वर आडाणी (वय ११), अक्षरा ज्ञानेश्वर आडाणी (वय ८), युवराज ज्ञानेश्वर आडाणी (वय ७) अशी मृतांची नावे आहेत.

९:३० वाजता गोंदी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी गोंदी पोलीस दाखल झाले असून, विहीरितून मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेने जिल्हा हादरला आहे.

Back to top button