घनसावंगी; (जि जालना) : पुढारी वृत्तसेवा; घनसावंगीत थकीत वीजबिलामुळे शेतीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. याच्या निषेधार्थ शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने (शुक्रवार) महावितरण कार्यालयासमोर 'लाइट बंद तर ऑफिस बंद 'आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे रब्बी हंगामात विजेअभावी शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. अशा स्थितीत शेतीपंपाचे चालू बिल वसुलीचे काम महावितरणच्या घनसावंगी विभागांतर्गत सुरू आहे. थकीत शेत शिवारातील वीजबिलांमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. यामुळे घनसावंगी तालुक्यातील खंडित केलेला वीजपुरवठा तात्काळ चालू करावा म्हणून शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने घनसावंगी येथील महावितरण कार्यालयासमोर लाईट बंद तर, ऑफिस बंद, लाईट चालू तर ऑफिस चालू हे आंदोलनाल करण्यात आले.
या आंदोलनाला सकाळी सुरवात झाली. घनसावंगी येथे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्ष यांच्या वतीने घनसावंगीत महावितरण कार्यालयासमोर सुरू असलेल्या आजच्या लाईट बंद तर ऑफिस बंद लाईट चालू तर ऑफिस चालू या आंदोलनाला अखेर यश आले. या आंदोलनाची दखल घेत उपकार्यकारी अभियंता डी. वाय. सूर्यवंशी यांनी वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार शेतशिवारातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. यावेळी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विश्वंभर भानुसे, अरविंद घोगरे, राजेंद्र अटकळ, अशोक हेमके यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा :