जालना : वडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार आला समाेर : नागरीकांमधून तीव्र संताप व्यक्त | पुढारी

जालना : वडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार आला समाेर : नागरीकांमधून तीव्र संताप व्यक्त

वडीगोद्री (जि. जालना ) पुढारी वृत्तसेवा : एकीकडे वडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर कर्मचारी नसल्याने महिलेची प्रसूती भर पावसात रस्त्यात झाली होती. ही विदारक घटना घडून चोवीस तास उलटले नाहीत. त्यातच वडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात आज एका कुत्रीची प्रसूती होते हा अजब प्रकार घडला. वडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार समोर आला. दोन दिवसात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

वडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने आरोग्य केंद्र वाऱ्यावर असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. गावातील सर्व संतप्त नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. या घडलेल्या प्रकारबाबत संबंधित डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांना निलंबित करावे. अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे असे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.

वडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर भर पावसात महिलेची प्रसूती झाल्याचा प्रकार नागरिकांना कळताच दि ३१ जुलै रोजी सकाळी १० वाजता काही नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले होते. आरोग्य केंद्रात त्याच क्षणी एका कुत्रीने चार पिलांना जन्म दिला. हा अजब प्रकार घडल्याचे समोर येताच नागरिक संतप्त झाले. नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी केली हाेती. यावेळी त्‍यांनी तीव्र संताप व्‍यक्‍त केला.

प्राथमिक आरोग्य केंद्रात घडलेला हा प्रकार निंदनीय आहे. वडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्र येथे फक्त शिपाई व औषध निर्माण कर्मचारी असतात. आरोग्य सेविका व कर्मचारी रुग्ण तपासण्यासाठी आले तर त्यांना जालना औरंगाबाद जा, असे म्हणतात हा प्रकार धक्कादायक आहे. आरोग्य केंद्रात अस्वच्छता असून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही.

रत्नप्रभा पंढरीनाथ खटके, सरपंच वडीगोद्री (ता.अंबड )

हेही वाचा

Back to top button