Haffkine Scam: 'घोटाळ्याची माहिती अजित पवारांपर्यंत कशी पोहोचली', कर्मचाऱ्याचे निलंबन?, विजय कुंभारांचा आरोप

Haffkine Drug Scam Maharashtra: हाफकिनच्या ६५ कोटींच्या औषध खरेदीत गैरप्रकार झाल्याचा आरोप विजय कुंभार यांनी केला आहे. चौकशीऐवजी माहिती देणाऱ्यावर कारवाई झाल्यामुळे पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Haffkine Drug Scam
Haffkine Drug ScamPudhari
Published on
Updated on

Haffkine Drug Scam Maharashtra: महाराष्ट्रातील हाफकिन संस्थेच्या औषध खरेदी प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी ६५ कोटी रुपयांच्या औषध खरेदीत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत प्रशासनावर थेट निशाणा साधला आहे. या प्रकरणामुळे वैद्यकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

कुंभार यांनी केलेल्या पोस्टनुसार, गेली अनेक वर्षे वापरात न आलेला निधी अचानक वापरण्यात आला आणि त्यानंतर घाईघाईने खरेदी आदेश जारी करण्यात आले. विशेष म्हणजे, संबंधित अधिकाऱ्यांची बदली जाहीर होताच हा निर्णय घेण्यात आल्याने संशय अधिकच वाढला आहे.

या संपूर्ण प्रकरणात सर्वात महत्त्वाचा मुद्दा कुंभार यांनी उपस्थित केला आहे तो म्हणजे प्रशासनाचा दृष्टिकोन. त्यांच्या मते, भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याऐवजी प्रशासनाने “ही माहिती बाहेर कशी आली?” यावर लक्ष केंद्रित केले.

कुंभार यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले आहे की, जर एखादा गैरप्रकार उघड झाला असेल, तर त्याची चौकशी करण्याऐवजी माहिती देणाऱ्यालाच लक्ष्य करणे हे चिंताजनक आहे.

विजय कुंभार यांची पोस्ट काय?

“अजित दादा पवार यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचलीच कशी?” माहितीमधून उघड होणाऱ्या भ्रष्टाचार आणि गैरप्रकारांची चौकशी करण्याऐवजी हाच पहिला प्रश्न हाफकिन प्रशासनाने एका कर्मचाऱ्याला विचारला आहे. अजित दादांनी या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी असे म्हटले होते. दादांना माहिती दिल्याबद्दल एका व्यक्तीला निलंबितही केले गेले आहे.

यातून सर्व काही स्पष्ट होते.

जेव्हा लक्ष आरोपांच्या मूळ मुद्द्यांवरून माहिती कुठून आली यावर केंद्रित होते, तेव्हा ते प्रशासन नसते — तो डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न असतो.

संदेशाकडे दुर्लक्ष करून संदिग्ध संदेशवाहकाला शिक्षा देणे म्हणजे भ्रष्टाचारापेक्षा पारदर्शकतेची भीती अधिक असल्याचे स्पष्ट लक्षण आहे.

Haffkine Drug Scam
LPG Shortage: गॅस संकट वाढले! LPG तुटवड्याचा फटका आता दूध उद्योगाला; किंमती वाढण्याची शक्यता

पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत

या प्रकरणामुळे सरकारी खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि जबाबदारी यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. कुंभार यांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

प्रशासनाकडून अद्याप स्पष्ट प्रतिक्रिया नाही

या आरोपांवर प्रशासनाकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र, या प्रकरणाची चौकशी होणार का आणि दोषींवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विजय कुंभार यांच्या आरोपांनंतर आता सरकार आणि संबंधित यंत्रणांकडून ठोस पावले उचलली जातात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news