Girish Mahajan: ऑपरेशन ब्लू स्टारवरून गिरीश महाजनांच्या वक्तव्याने खळबळ; ‘काळा दिवस’ म्हणत इंदिरा गांधींवर केली टीका

Girish Mahajan On Operation Blue Star: अमृतसरमध्ये ऑपरेशन ब्लू स्टारच्या स्मृतिदिन कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी या कारवाईला "काळा दिवस" असे संबोधले.
Girish Mahajan On Operation Blue Star
Girish Mahajan On Operation Blue StarPudhari
Published on
Updated on

Girish Mahajan On Operation Blue Star: ऑपरेशन ब्लू स्टारच्या ४२व्या स्मृतिदिनानिमित्त पंजाबमधील अमृतसर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या कार्यक्रमात बोलताना महाजन यांनी ऑपरेशन ब्लू स्टारला "काळा दिवस" असे संबोधले. तसेच या कारवाईत मृत्यूमुखी पडलेल्या काही जणांचा उल्लेख "शहीद" असा केल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमृतसरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात शीख समुदायाच्या भावना आणि १९८४ मधील घटनांचा संदर्भ देत महाजन यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निर्णयावर टीका केली. सुवर्ण मंदिर परिसरात सैन्य कारवाई करण्याचा निर्णय हा शीख समाजासाठी वेदनादायी ठरल्याचे त्यांनी म्हटले. या कारवाईदरम्यान अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आणि समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या, असा आरोपही त्यांनी केला.

Girish Mahajan On Operation Blue Star
ATM Cash Crunch: देशात रोख रकमेचा तुटवडा? केंद्र सरकार अलर्ट मोडवर; बँकांना दिला तातडीचा इशारा, काय घडतयं?

महाजन यांनी आपल्या भाषणात ऑपरेशन ब्लू स्टारची तुलना १८व्या शतकातील अहमदशाह अब्दालीच्या आक्रमणाशी केली. तसेच १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात झालेल्या शीखविरोधी दंगलींचा उल्लेख करत काँग्रेसवरही टीकास्त्र सोडले. त्या काळात शीख समाजाला अन्याय आणि हिंसाचाराचा सामना करावा लागला, असे ते म्हणाले.

राजकीयदृष्ट्या महत्त्वाची बाब म्हणजे, शीख विभाजनवादी नेता जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांचे उदात्तीकरण करणाऱ्या कार्यक्रमात राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणारे गिरीश महाजन हे भाजपचे पहिले मंत्री ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे विरोधकांकडून प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.

Girish Mahajan On Operation Blue Star
Arjun Tendulkar IPL debut |'क्रिकेट तुमच्या संयमाचीही परीक्षा घेते!' : सचिनने मुलासाठी लिहिली खास आणि भावूक पोस्ट

यावेळी महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही उल्लेख केला. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर व्यस्त कार्यक्रमामुळे फडणवीस यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, पुढील वर्षी मुख्यमंत्री फडणवीस यांना सोबत घेऊन पुन्हा अमृतसरला येण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाहीही त्यांनी उपस्थितांना दिली.

महाजन यांच्या या वक्तव्यांनंतर महाराष्ट्रासह राष्ट्रीय राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटण्याची चिन्हे दिसत आहेत. ऑपरेशन ब्लू स्टार, १९८४ च्या दंगली आणि शीख समाजाशी संबंधित संवेदनशील मुद्द्यांवरून येत्या काळात राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news