महाराष्ट्र
Flight Service | 31 ऑगस्टपासून गोवा, सिंधुदुर्गमधून पुण्याला विमानसेवा सुरू
Flight Service | ही विमानसेवा शनिवार दि. ३१ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
पणजी : गोव्यातील विमान कंपनी 'फ्लाय-९१'तर्फे शनिवारी व रविवारी आठवड्यातील दोन दिवस गोवा ते पुणे आणि सिंधुदुर्ग (चिपी) ते पुणे आणि परत अशी विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे.
ही विमानसेवा शनिवार दि. ३१ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. उत्तर गोव्यातील मोप येथील विमानतळावरून सकाळी ६.३५ वा. पुण्याला जाणारे विमान सुटेल, ते ७.४० वा. पुणे येथे पोहोचेल. तेच विमान पुणे येथून सकाळी १०.५५ वा. गोव्याला येण्यासाठी उड्डाण करेल.
पुणे येथून सकाळी ८.०५ वा. विमान निघणार असून, ते सकाळी ९.१० वा. सिंधुदुर्ग विमानतळावर पोहोचणार आहे. तेथून ते विमान सकाळी ९.३० वा. सुटून सकाळी १०.३५ वा. पुणे येथे उतरणार आहे.