हिजबुल्लाच्या हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये आणीबाणीची परिस्थिती

Israel vs Hezbollah War : इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी बोलावली सुरक्षा मंत्रिमंडळाची बैठक
israel hezbollah war
इस्रायल आणि लेबनॉनमधील इराण-समर्थित संघटना हिजबुल्लामधील युद्ध वाढत आहे. File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Israel vs Hezbollah War : इस्रायल आणि लेबनॉनमधील इराण-समर्थित संघटना हिजबुल्लामधील युद्ध वाढत आहे. इस्रायलच्या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या लेबनॉनने उत्तर इस्रायलच्या दिशेने किमान 320 रॉकेट डागले. तथापि, आयर्न डोमने लेबनीज रॉकेटला हवेतच रोखण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हिजबुल्लाला धडा शिकवण्यासाठी सुरक्षा मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. अशा स्थितीत मध्य आशियातील तणावाने भीषण युद्धाचे स्वरूप धारण केले आहे.

इस्रायली आर्मी (IDF) लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या स्थानांवर वेगाने हवाई हल्ले करत आहे आणि 100 हून अधिक स्थानांना लक्ष्य केले. लेबनॉनच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने हे पाऊल उचलले आहे. दरम्यान, हिजबुल्लाच्या ठिकाणांवर हल्ले होत असताना, इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी सुरक्षा मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. इस्रायली मीडियानुसार, IDF चीफ ऑफ स्टाफ वैयक्तिकरित्या या हल्ल्यांवर लक्ष ठेवून आहे.

तेल अवीव जवळील बेन गुरियन विमानतळावरील उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत. इस्रायलच्या राष्ट्रीय आणीबाणी आणि रुग्णवाहिका सेवा विभागाने (एमडीए) देशभरात गंभीर स्वरुपाच्या सतर्कतेचा इशारा जाहीर केला आहे.

हिजबुल्लाहच्या निवेदनानुसार, इस्रायली लष्कराला लक्ष्य करत अनेक स्फोटक ड्रोन डागण्यात आले आहेत. याशिवाय इस्रायलवरही क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला आहे. प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनेही लेबनॉनवर हल्ला चढवला आहे. इस्रायली लष्कराने सांगितले की, हिजबुल्लाला प्रत्युत्तर देण्यासाठी रविवारी सकाळी लष्करी विमाने तैनात करण्यात आली होती.

इराणमध्ये हमास प्रमुखाच्या हत्येनंतर इराण आणि इस्रायलमधील तणाव शिगेला पोहोचला होता. इराण हा लेबनॉनमधील हिजबुल्लाचा कट्टर समर्थक आहे. लष्करी कारवाईत हिजबुल्लाचा कमांडर फौद शुकूरही मारला गेला. ज्यामुळे हिजबुल्लाहने बदला घेण्यासाठी इस्रायलवर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ला केल्याचे समोर आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news