Maharashtra road accidents: रस्ते अपघातात एका वर्षात तब्बल 15, 434 जणांचा मृत्यू; 'CID'च्या अहवालातून कारण समोर

वाहतूक नियमांचा भंगांमुळे रस्‍ते अपघाताला निमंत्रण, मागील वर्षी तब्‍बल १५, ४३४ जणांनी रस्‍ते अपघातांमध्‍ये गमावला जीव
Maharashtra Road Accident
Maharashtra Road AccidentPudhari
Published on
Updated on

Maharashtra road accidents CID Police Report

मागील वर्षी म्‍हणजे २०२४ या संपूर्ण वर्षात राज्‍यात तब्‍बल ३०,६४८ रस्ते अपघातांची नोंद झाली. यामध्‍ये १५,९०१ लोकांचा मृत्यू झाला. २०२३च्‍या तुलनेत रस्‍ते अपघातात मृत्‍यूमुखी पडणार्‍या लोकांची आकडेवारी ५००ने वाढली आहे. २०२३ या वर्षात राज्‍यात ३१ हजार ३४७ रस्‍ते झाला झाले होते यामध्‍ये १५, ४३४ जणांनी आपला जीव गमावला होता. तर २०२२ मध्‍ये २०२२ मध्ये २०,५४६ अपघातांमध्ये १५,७४८ जणांचा मृत्यू झाला होता, अशी आकडेवारी राज्यातील गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) आपल्‍या अहवालात दिली आहे. त्‍याचबरोबर महाराष्‍ट्रात रस्‍ते अपघातांमधील मृतांची संख्‍या वाढण्‍यामागे मुख्‍य कारणे हे बेदरकार वाहन चालवणे आणि वाहतूक नियमांकडे केलेले दुर्लक्ष हेच आहे, असेही या अहवालात नमूद करण्‍यात आले आहे.

Maharashtra Road Accident
Road Accident Report : भारतात मागील वर्षी रस्‍ते अपघातात १.६८ लाख लोकांचा मृत्यू

सर्वाधिक रस्ते अपघाती मृत्यू नाशिक ग्रामीण भागात

राज्‍यात ज्‍या जिल्‍ह्यांमध्‍ये मोठे महामार्ग आहेत तेथे तेथे अपघाती मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे. लहान जिल्ह्यांमध्ये अपघात व मृत्यू तुलनेने कमी आहेत.ग्रामीण तसेच शहरी भागातून जाणाऱ्या महामार्गांवर अनेक अपघात होतात आणि जीवितहानी होतात.राज्‍यात मागील वर्षी रस्‍ते अपघातामध्‍ये सर्वाधिक मृत्‍यू हे नाशिक जिल्‍ह्यातील ग्रामीण भागात झाले आहेत. या जिल्‍ह्यात १,०१६ जणांनी रस्‍ते अपघातात आपला जीव गमावला. यानंतर पुणे ग्रामीणमध्‍ये ९६७ जणांचा अपघाती मृत्‍यू झाला आहे.

Maharashtra Road Accident
Accident insurance : गणेशोत्सवात रक्तदात्यांचा 10 लाखांचा अपघात विमा देऊन होणार सन्मान

बेदरकारपणे वाहन चालवणे हीच सर्वात चिंतेची बाब

सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक सुनील रमनंद यांनी 'टाईम्स ऑफ इंडिया'शी बोलताना सांगितले की, शहरातील प्रशासनाबरोबर समन्‍वयाच्‍या माध्‍यमातून अपघाती मृत्‍यू कमी करण्‍यासाठी पोलीस प्रशासन उपाययोजना करत आहे. मात्र अपघातामागील मुख्‍य कारण हे वाहनचालकांचे बेदरकार आणि बेफाम वाहन चालवणे आहे.

Maharashtra Road Accident
Indian Submerged Village |भारतातील एक असे गाव जे पाण्यात वसले आहे

ग्रामीण भागात अपघातांची संख्‍या अधिक

ग्रामीण भागात अपघातांची संख्या अधिक आहे, दुचाकीस्वारांनी हेल्मेटशिवाय प्रवास करणे तसेच फोरव्‍हिलरमधील प्रवाशांनी सीट बेल्टचा वापर टाळे हे अत्यंत धोकादायक आहे. राष्ट्रीय महामार्गांवर ट्रक व चारचाकी वाहने बेदरकारपणे धावतात, हे मोठ्या चिंतेचे कारण आहे. विशेषतः अहिल्यानगर-कल्याण आणि पुणे-नाशिक महामार्गांवर मोठे अपघात घडले आहेत. ग्रामीण भागातील महामार्गांवर बस किंवा एसयूव्हीचे अपघात झाले, तर अनेक मृत्यू होतात.राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर अनेक पायाभूत समस्या आहेत. आमच्या टीम्स मृत्यू झालेल्या अपघातस्थळी जाऊन राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने अभ्यास करतात. अनधिकृत प्रवेश/बाहेर पडण्याचे मार्ग बंद करणे, 'ब्लॅक स्पॉट्स' कमी करणे, डिव्हाइडर्स बांधणे अशी कामे आम्ही करत आहोत, असेही पोलीस प्रशासनाने म्‍हटलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news