

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक सरकारने गणेशोत्सवाला परवानगी दिली आहे. सरकारने गणेशोत्सवाला परवानगी देताना काही अटीही घातल्या आहेत. यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले आहेत.
गणेशोत्सव संदर्भात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला परवानगी दिले आहे. मात्र यासाठी काही अटीही घातल्या आहेत.
गणेशोत्सव केवळ तीन दिवसांसाठी असणार आहे. गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या ठिकाणीच विसर्जन करावे लागणार आहे.
मिरवणूक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
तसेच केरळ राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या तालुक्यांमध्ये गणेशोत्सवाला पूर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहेत.