लंडन; पुढारी ऑनलाईन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ओव्हल कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वीच एक धक्कादायक वृत समोर आले आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे शास्त्री यांच्यासह भारतीय संघाच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या चार सदस्यांना विलगिकरणात ठेवण्यात आले आहे.
बीसीसीआयने एक प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. त्यानुसार मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल यांना विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. सर्वांची आरटी-पीसीआर (RT-PCR) चाचणी झाली आहे. ज्या सदस्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे त्यांना ओव्हल येथे खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यावेळी मैदानवर जाण्याची परवनगी देण्यात आली आहे. भारतीय संघ चौथ्या दिवसाचा खेळ आपल्या प्रशिक्षकांच्या अनुपस्थितीत खेळत आहे.
ताज्या अपडेटनुसार, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल यांना संघाच्या उर्वरित सदस्यांपासून वेगळे करण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय संघ चौथ्या दिवसाचा खेळ आपल्या प्रशिक्षकांच्या अनुपस्थितीत खेळत आहे.