ED Raid : औरंगाबादेत ईडीचे छापासत्र | पुढारी

ED Raid : औरंगाबादेत ईडीचे छापासत्र

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : देशभरात ईडी आणि सीबीआयच्या (CBI) कारवाईचे सत्र सुरू असताना आज गुरुवारी (दि. 11) ईडीने (ED) औरंगाबादेत सात ठिकाणी छापे टाकले. या कारवाईने एकच खळबळ उडाली असून काही उद्योजक आणि बिल्डर टार्गेट केले आहेत.

शहरातील जुन्या मनमंदिर कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या बिल्डर आणि उद्योजकाच्या कार्यालयावर सध्या छापेमारी सुरु आहे. ईडीच्या 54 अधिकाऱ्याची टीम औरंगाबादेत दाखल झाली आहे. औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती ठिकाणी हे धाडसत्र सुरू आहे. यामध्ये नक्षत्रवाडी परिसराचा समावेश आहे. दोन बड्या उद्योजकांच्या सात वेगवगळ्या ठिकाणांवर छापासत्र सुरू आहे. यामध्ये अपसंपत्ती आणि मनी लाँड्रींगच्या आधारे हे छापासत्र सुरू असल्याची माहिती आहे. ईडीला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनंतर हे धाडसत्र सुरू आहे.

Back to top button