औरंगाबाद : चारित्र्याच्‍या संशयातून पत्नी, चिमुकल्याचा गळा आवळून खून

औरंगाबाद : चारित्र्याच्‍या संशयातून पत्नी, चिमुकल्याचा गळा आवळून खून

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाचा खून केल्‍याची धक्‍कादायक घटना  औरंगाबादेतील कांचनवाडी भागात आज (दि. ९) पहाटे घडली.आरती समीर म्हस्के (वय २९, रा. भाग्यनगर, आनंदविहार रोड ), निशांत समीर म्हस्के अशी मृतांची नावे आहेत.

सातारा पोलिसांनी आरोपी पती समीर विष्णू म्हस्के याला ताब्यात घेतले आहे. समीरच्या आईचाही आरोपींमध्ये समावेश आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली. चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी आणि मुलाचा गळा आवळून खून केल्याची माहिती आरोपीनेच फोन करून पोलिसांना दिल्‍याचे, पोलीस उपनिरीक्षक संभाजी गोरे यांनी सांगितले.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news