

औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा :
कपडे आणि मिठात गुंडाळलेला मृतदेह किचन ओट्याखाली रेती व सिमेंटमध्ये पुरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यावर शेंदूर लावलेले दोन दगड ठेवलेले असून, लिंबू वाहिलेले आहे. किरायाचे पैसे थकल्याने व भाडेकरू फोनला प्रतिसाद देत नसल्याने खोलीवर गेलेल्या घरमालकाच्या पाहणीत बुधवारी वाळूजमधील समता कॉलनीत ही घटना उघडकीस आली.(Human sacrifice)
मृतदेह तरुणीचा असल्याचा अंदाज आहे. वाळूज पोलिसांनी गायब असलेल्या भाडेकरूचा शोध सुरू केला आहे. पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांनी सांगितले, की वाळूज येथील कामगार वस्ती म्हणून समता कॉलनीची ओळख आहे. बजाज कंपनीतील फायरमन सूर्यकांत गोरखनाथ शेळके (५७, रा. वाघुली, ता. शेवगाव, जि. नगर) यांचे समता कॉलनीत दोन हजार स्के. फुटांचे घर आहे. तळमजल्यात ७ तर वरच्या मजल्यावर ३ खोल्या असून, त्यांनी या खोल्या किरायाने दिलेल्या आहेत. २० मे २०२२ पासून तळमजल्यात किरायेदार म्हणून काकासाहेब नामदेव भुईगड (रा. धानोरा, ता. फुलंब्री) हा त्याच्या दोन मुली व पत्नीसह राहत होता. नवरात्रोत्सवात तो मूळगावी जाऊन येतो, असे घरमालकास म्हणाला होता. त्याच्याकडे एका महिन्याचे भाडे थकीत असल्याने घरमालक शेळके हे त्याला अधूनमधून फोन करून भाडे मागत होते. १२ ऑक्टोबरला फोन करून त्यांनी घरभाडे मागितले असता संध्याकाळपर्यंत पैसे देतो, असे तो म्हणाला. मात्र, त्याने पैसे अद्याप दिलेले नाहीत.
१४ डिसेंबरला सकाळी ९ वा. शेळके यांनी पुन्हा काकासाहेबला फोन केला. मात्र, त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे शेळके हे खोलीवर गेले. तेव्हा खोलीला बाहेरून कुलूप होते. त्यांनी- कुलूप तोडून आत प्रवेश केला असता, घरात कुठल्याही संसारोपयोगी वस्तू दिसल्या नाहीत. त्यावरून भाडेकरू काकासाहेब हा आधीच खोली खाली करून गेल्याचे दिसून आले. अन् घरमालकाला बसला धक्का खोलीची पाहणी करीत सूर्यकांत शेळके हे किचनमध्ये गेले. तेथे त्यांना किचन ओट्याखालील अर्धा भाग रेती व सिमेंटने बंद केलेला दिसला. त्यावर दोन दगड ठेवलेले होते. दोन्ही दगडांना शेंदूर लावला होता. तेथे लिंबू वाहिलेले दिसून आले. हा काही तरी विचित्र प्रकार त्यांच्या नजरेत आल्यावर येथे काय केले? असा प्रश्न शेळके यांना पडला. त्यामुळे त्यांनी टिकाव व फावडे आणून रेती व सिमेंट फोडले. त्यात कपड्यात गुंडाळलेला मृतदेह दिसला. त्यावर मोठ्या प्रमाणात मीठ टाकलेले आढळले. त्यांनी तत्काळ ही माहिती वाळूज पा लिसा ना दीली.
हेही वाचा