औरंगाबाद हादरले! घाटी रुग्‍णालयासमोरील झोपडीत दोघांची निर्घृण हत्या | पुढारी

औरंगाबाद हादरले! घाटी रुग्‍णालयासमोरील झोपडीत दोघांची निर्घृण हत्या

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : दिवाळीत सुरू झालेले खुनाचे सत्र सुरूच असून, शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेमुळे हादरले आहे. घाटी रुग्‍णालयासमोर रस्त्यावर दोघांची हत्या करण्यात आली आहे. एकाच्या डोक्यात दगड घालून तर दुसऱ्याचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. (रविवार) रात्री ही घटना घडली. विशेष म्हणजे नेहमीच गर्दीचे ठिकाण असणाऱ्या आणि औरंगाबादची लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या घाटी रुग्णालयाच्या बाजूला दोन्ही खुनाच्या घटना घडल्याचे समोर आले. तर घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.

मृतांमध्ये एक भिकारी आणि दुसरा शहरातील तरुण आहे. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरातील खुनाच्या घटना वाढल्याचे पाहायला मिळत आहे. दिवाळीत एकामागून एक अशा तीन खुनाच्या घटना घडल्या होत्या. त्यातच आता पुन्हा एकदा एकाचवेळी दोघांची हत्या करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. हत्या करण्यात आलेला एक व्यक्ती रस्त्यावर भीक मागून उदरनिर्वाह करत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मध्यरात्री हे खून झाल्याची पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली आहे. तर घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले असून, पुढील तपास करण्यात येत आहे.

दरम्‍यान दोन संशयीत आरोपींना बेगमपुरा पोलीस व गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. नागेश घुसे आणि संग्राम रकट अशी मृतांची नावे असून, संशयीत आरोपी वजीर बशीर शेख आणि रिजवान खान यांना अटक करण्यात आली आहे. हे खून नशेखोरीतून झाल्याचे उघड झाले आहे.

हेही वाचा :  

Back to top button