शिर्डी : चंद्रग्रहणामुळे श्री साई मंदिराच्या वेळेत बदल | पुढारी

शिर्डी : चंद्रग्रहणामुळे श्री साई मंदिराच्या वेळेत बदल

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा :  श्रीसाईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या वतीने (दि. 8 नोव्हेंबर 2022) रोजी खग्रास चंद्रग्रहण असल्याने श्रीसाईबाबा समाधी मंदिराच्या दैनंदिन कार्यक्रमांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. दुपारी 2.30 ते सायंकाळी 6.19 यावेळेत श्रींचे समोर मंत्रोच्चार होणार असल्यामुळे मंत्रोच्चार होईपर्यंत भाविकांना समाधी मंदिराचे सभा मंडपापासुन दर्शन सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.

बानायत म्हणाल्या, (दि. 8 नोव्हेंबर 2022) रोजी दुपारी 2.30 ते सायंकाळी 6.19 याकाळात खग्रास चंद्रग्रहण (ग्रस्तोदित) आले आहे. यामध्ये दुपारी 2.30 वाजता श्रींचे दर्शन बंद होईल. दुपारी 2.39 वाजता समाधी मंदिरात मंत्रोपच्चार सुरू होईल, सायंकाळी 6.19 वाजता मंत्रोपच्चार संपल्यानंतर सायंकाळी 6.30 वा. श्रींचे मंगलस्नान होईल. यानंतर सायं. 6.45 वा. श्रींची ‘शिरडी माझे पंढरपूर’ आरती होईल. सायं. 7 वा. श्रींची धुपारती होईल. आरतीनंतर भाविकांना दर्शनरांगा पुर्वीप्रमाणे सुरू होतील, असे बानायत म्हणाल्या.

Back to top button